Successful transplantation of an 84-year-old tree in Nagpur : ‘ट्री ट्रान्सप्लान्टेशन’ केले यशस्वी, ८४ वर्षे जुन्या झाडाला हलवले
Nagpur नागपूर महानगरपालिकेचं कौतुक झालं, असं कधी ऐकलय का? असा प्रश्न नागपूरकरांना विचारला तर प्रसंग आठवायला देखील वेळ लागेल. पण सध्या अख्खं शहर महापालिकेचं कौतुक करत आहे. एका ८४ वर्षे जुन्या झाडाचे यशस्वी ट्रान्सप्लान्टेशन केल्याबद्दल मनपा प्रशासनावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या एकूणच प्रशासकीय आणि राजकीय इतिहासात अश्याप्रकारचे काम पहिल्यांदाच झाले आहे.
भांडे प्लॉट चौक वर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे फ्लाय ओव्हर बांधण्यात येत आहे. या रस्त्यावर मुखर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलजवळ पिंपळाचा मोठा ८४ वर्ष जुना वृक्ष वाहतुकीसाठी अडथळा होता. या ३० फूट उंच झाडाला ट्री ट्रान्सप्लान्टेशन मशीनच्या Tree Transplantation Machine सहाय्याने जमिनीतून उचलून दुसऱ्या ठिकाणी लावण्यात आले. हे करताना झाडाच्या मुळांना आणि खोडाला कुठलेही नुकसान झाले नाही, हे विशेष.
Sanjay Nirupam Vs Aditya Thackeray : मिठी नदी सफाई घोटाळ्या आदित्य ठाकरेंचा हात!
मनपाच्या उद्यान आणि वर्कशॉप विभागाने भांडे प्लॉट येथील पिंपळाच्या वृक्षाचे मशीनच्या सहाय्याने भविष्य निर्वाह निधी कार्यालयाजवळ यशस्वीपणे प्रत्यारोपण करण्यात आले. डकोटा कंपनीचे हे महाराष्ट्रातील दुसरेच मशीन आहे. ठाणे महानगरपालिकाकडे सुद्धा हेच मशीन आहे. या मशीनचे काम रिमोटद्वारा केले जाते. या मशीनच्या खरेदीसाठी जिल्हा नियोजन निधीतून ५ कोटी ४७ लक्ष रुपयांची तरतूद झाली आहे. मनपातर्फे खरेदी करण्यात आलेल्या या मशीनला प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहन क्रमांक सुद्धा प्राप्त झाला आहे.
असे झाले Transplantation
जेसीबीने JCB झाडाच्या जवळ मोठा खड्डा करण्यात आला. त्यानंतर मशीनच्या सहाय्याने झाडाला उचलण्यात आले. दुसऱ्या ठिकाणी लावण्यात आले. या मशीन मध्ये १६०० लिटर पाण्याची टाकी सुद्धा आहे. झाड काढताना आणि लावताना या टाकीतून झाडाच्या मुळांना पाणी जात राहते.