Tax increase in Nagpur municipality will be avoided this year : यंदा नागपूर मनपातील करवाढ टळणार
Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीला डोळ्यासमोर ठेवून यावेळेस नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यंदा मनपाकडून करवाढ टाळण्यात येईल असे संकेत समोर येत आहेत.
महापालिकेची पंचवार्षिक मुदत ५ मार्च २०२२ रोजी संपली. कोरोना निर्बंध, इतर मागासवर्ग आरक्षणाचे न्यायप्रविष्ट प्रकरण, राज्यातील बदलती राजकीय समीकरणे व सत्तांतरे यामुळे निवडणूक लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात प्रलंबित याचिकेवर सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही सुनावणी २५ फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे मनपा निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, आगामी २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या महापालिका अर्थसंकल्पाची तयारी मनपा प्रशासकांनी सुरू केली आहे.
Sudhir Mungantiwar : देशाच्या प्रगतीमधील केजरीवाल नावाचा अडसर हटला !
महापालिकेची निवडणूक होणार असल्याने सत्तारुढ पक्षाला कुठलीही करवाढ परवडणारी नाही. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प करमुक्त राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महापालिका निवडणुका लांबल्यामुळे मनपाचा अर्थसंकल्प यंदाही स्थायी समिती सभापतीऐवजी मनपा प्रशासक पुढील महिन्यात सादर करण्याची शक्यता आहे.
यंदा महापालिकेच्या उत्पन्नात प्रचंड घट झाली आहे. महापालिकेच्या काही विभागाकडून प्राप्त झालेला उत्पन्नाचा आकडा २०६३.५० कोटींचा आहे. विशेष म्हणजे शासनाकडून जीएसटी वगळता २५८ कोटींचे अनुदान महापालिकेला प्राप्त झाले. याचा अर्थ २०२५-२६ चा अर्थसंकल्प कमी होण्याची शक्यता आहे.
महापालिकेची मुदत संपल्यानंतर २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा २६५७.१३ कोटींचा अर्थसंकल्प तत्कालिन मनपा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी सादर केला होता. दुसऱ्या वर्षीचा ३३३६.८४ कोटींचा अर्थसंकल्पही राधाकृष्णन बी. यांनी सादर केला होता. दरम्यान, त्यांची बदली झाल्यानंतर डॉ. अभिजित चौधरी हे प्रशासक व आयुक्त म्हणून नियुक्त झाल्यानंतर त्यांनी २०२४-२५ चा अर्थसंकल्प ५५२३.७३ कोटींचा सादर केला होता. तो गेल्यावर्षीच्या तुलनेत २ हजार कोटींने अधिक होता.