FIR against husband of former Zilla Parishad president : माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पतीविरुद्ध कारवाई
Nagpur सरपंच असताना पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी विष्णू कोकड्डे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णू कोकड्डे हे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांचे पती आहेत. त्यामुळे या घटनेची चांगलीच चर्चा होत आहे.
बनावट कायदेशीर कागदपत्र तयार करून जमिनीची विक्री करणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांच्या पतीला चांगलेच महागात पडले आहे. संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. यात आणखी कोण सहभागी आहेत, याचा तपास सुरू आहे.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांचे पती विष्णू कोकड्डे यांच्यावर खापरखेडा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. विष्णू कोकड्डे हे सरपंच असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बनावट व गैर कायदेशीर कागदपत्राद्वारे पिंपळा डाक बंगला येथील २.३२ हेक्टर जमिनीवर लेआऊट पाडून विक्री केली आहे.
Threat to Naib Tehsildar : बच्चू कडू यांच्या माजी पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
यासंदर्भात पिंपळा ग्रामपंचायतीचे सदस्य अतुल पाटील यांनी या प्रकरणाची तक्रार पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. या प्रकरणी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सहा. गटविकास अधिकारी पंचायत समिती सावनेर यांच्या अध्यक्षतेत ४ सदस्यांची चौकशी समिती गठित केली होती.
या प्रकरणाच्या चौकशीमध्ये अध्यक्षाचे पती विष्णू कोकड्डे हे दोषी आढळून आले होते. या प्रकरणात राजेंद्र नारनवरे व संतोष महतो यांनी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी सरपंच विष्णू कोकड्डे यांच्याशी संगणमत करून ग्रामपंचायत अधिकारी धर्मेंद्र बन्सोड यांच्यावर दबाव टाकून कागदपत्र तयार केले होते.
Atul Londhe : गुन्हा दाखल होऊनही लोंढे थांबले नाहीत, पुन्हा घेतला फडणवीसांशी पंगा !
या चौकशीच्या अनुषंगाने पंचायत समिती सावनेरचे गटविकास अधिकारी मनोजकुमार हिरुडकर यांनी विष्णू कोकड्डे, राजेंद्र नारनवरे व संतोष महतो यांच्या विरुद्ध खापरखेडा पोलीसात तक्रार दाखल केली. पोलीसांनी या प्रकरणी फौजदारी गुन्ह्याची नोंद केली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या गैरप्रकारात आणखी राजकीय लोक सहभागी होते का याचा तपास सुरू आहे. या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.