Nana Patole : नाना पाटोलेंच्या राजीनाम्याचे काँग्रेस श्रेष्ठींनी काय केले?

What did Congress do with Nana Patole’s resignation? : नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड रखडली; इच्छुकांना प्रतीक्षा

Nagpur महाराष्ट्रात काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला. राजीनाम्याला तीन महिने लोटून गेले परंतु नव्या प्रदेशाध्यक्ष निवड झाली नाही. या राजीनाम्यानंतरही नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड न झाल्याने नाना पटोले यांच्या राजीनाम्याचे काँग्रेस श्रेष्ठींनी काय केले, असा सवाल उपस्थित होत आहे.

गेल्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर आतापर्यंत काँग्रेसची सर्वात खराब कामगिरीची नोंद झाली. एकेकाळी राज्यावर एकहाती सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेसला केवळ १६ आमदार निवडून आणता आले. या दारुण पराभवानंतर नैतिक जबाबदारी म्हणून नाना पटोले यांनी काँग्रेस श्रेष्ठींकडे राजीनामा सोपविला.

या राजीनामा पत्रावर विचार करायला काँग्रेस श्रेष्ठींना वेळ नाही. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हाही घोषित होऊ शकतात. परंतु महाराष्ट्रात पूर्ण वेळ प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती झालेली नाही.

 

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या आरोपांना निवडणूक आयोग उत्तर देणार

 

 

तरुणांकडे महाराष्ट्राचे नेतृत्व द्यावे, असा मानणारा एक वर्ग आहे. यामुळे कोल्हापूरचे नेते बंटी पाटील Bunty Patil व लातूरचे आमदार अमित देशमुख Amit Deshmukh यांच्या नावांची चर्चा होती. एवढ्यात नागपुरातील दलित नेते नितीन राऊत Nitin Raut यांनाही महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व करण्याची इच्छा आहे.

नागपुरातील दलित नेते म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी त्यांनी काँग्रेस सत्तेत नसताना काँग्रेसच्या अ. भा. अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविले होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे नितीन राऊत यांच्या नावाची चर्चा आहे.

Nana Patole : भ्रष्ट मंत्री आणि अधिकाऱ्यांना सळो की पळो करुन सोडू !

राऊत यांच्या नावावर इतर नेते किती सहमती दर्शवतील, याबद्दल साशंकता आहे. महाराष्ट्रातील नेतृत्वाबद्दल निर्णय घेण्यासाठी काँग्रेसश्रेष्ठींना वेळ मिळत नाही. यामुळे नाना पटोले यांना आणखी किती दिवस अभय मिळणार आहे, असा सवालही आता सामान्य काँग्रेस कार्यकर्ते विचारू लागले आहेत. पटोले यांचे राहुल गांधी यांच्याशी निकटचे संबंध आहेत. त्यामुळे निर्णयाला उशीर होत असल्याचे बोलले जात आहे.