Congress Leader Nana Patole Levels Serious Allegations Against BJP : आपल्या विचारांची मते ठेऊन बाकी नावे काढून टाकण्याचा भाजपचा उद्योग
Nagpur : निवडणूक आयोगाने बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही व्हिडिओ कॉन्फरन्स करून तोंडी आदेश दिले आहेत. SIR लागू करण्यासाठी हे आदेश आहेत. सन २००० सालची यादी घेऊन १५ दिवसांत बीएलओ आणि एसडीओंकडून याद्या मागवण्याचे काम सुरू केलेले आहे. आपल्या विचारांची मते यादीमध्ये ठेऊन बाकीची नावे काढून टाकण्याचे काम भाजप करत आहे. हे यापुढे चालता कामा नये, असे काँग्रेस नेते आमदार नाना पटोले यांनी म्हटले आहे.
नाना पटोले यांनी आज (१८ सप्टेंबर) नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर कडवी टीका केली. ते म्हणाले, बिहारमध्ये मेलेली माणसं जिवंत दाखवतात, तर जिवंत माणसांना मेलेली दाखवतात. ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आली आहे. हा नरेंद्र मोदींचा फंडा आहे. भाजप आपल्या विचारांची मतं ठेऊन बाकीची मते यादीतून काढून टाकतात. आता आम्ही लोकांना जागरूक करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मतदार याद्या दुरूस्त झाल्या पाहिजेत. १५ दिवसांत यादी तयार करून पाठवली जाणार आहे. आधी मतदार यादी प्रसिद्ध करून नंतरच फायनल करावी. कारण आम्हाला पुन्हा मतं चोरी होण्याची भीती आहे.
Sudhir Mungantiwar : “सुधीरभाऊ मी आणि आरपीआय कायम तुमच्या सोबत”
नावं जाहीर करून स्थानिक निवडणुका झाल्या नाहीत. महायुती कुठल्याही पद्धतीने निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. १५ दिवसांत ग्रामपंचायत स्तरावर यादी जाहीर करावी, ही आमची मागणी आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने व्हाव्या. कारण मतांची चोरी सुरू आहे. लोकांनी आता जागरूक राहावे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले.