National Health Mission : कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; सरकारविरोधात आक्रोश

Contractual health workers’ protest against Government : बुलढाण्यात रॅली, वीस वर्षांपासून परिस्थिती ‘जैसे थे’

Buldhana राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कार्यरत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. शासकीय सेवेत समावेश व मानधनवाढीच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. शासनस्तरावरून कोणताही तोडगा न निघाल्याने आज बुलढाण्यात मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात आली.

जिजामाता प्रेक्षागृहापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या रॅलीत शेकडो कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले. गेल्या आठ दिवसांपासून हे कर्मचारी धरणे आंदोलन करत असून, आरोग्य सेवेत तब्बल दोन दशकांपासून काम करणारे NHM चे कर्मचारी आजही कंत्राटी तत्वावर तुटपुंज्या मानधनावर काम करतात, अशी खंत व्यक्त करण्यात आली.

Smart Village : मुख्यमंत्री फडणवीसांकडून देशातील पहिल्या ‘स्मार्ट’ गावाचे उदघाटन

२०२२ मध्ये उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दहा वर्षांहून अधिक सेवाधारक कर्मचाऱ्यांना समायोजनाचे आदेश दिले होते. यानंतर १४ मार्च २०२४ रोजी शासनाने ३०% पदांवर समायोजनाचा निर्णय घेतला. मात्र सव्वा वर्ष उलटूनही हा निर्णय फक्त कागदावरच आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

या रॅलीचे नेतृत्व NHM अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती आणि एकता संघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडे होते. राज्य समन्वयक संतोष तायडे, जिल्हा समन्वयक नितीन इंगळे, तसेच इतर अनेक पदाधिकारी आणि महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. ११८ संघटनांचे एकत्रीकरण असूनही शासन दुर्लक्ष करत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

Adivasi Pardhi Development Council : बीडममध्ये पारधी समाजावर अन्यायाचा कळस

कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या

१४ मार्च २०२४ च्या शासन आदेशाची तातडीने अंमलबजावणी
१० वर्षांहून अधिक सेवाधारक उर्वरित ६९ संवर्गातील कर्मचाऱ्यांचे नियमित समायोजन
मानधनात १५% वाढ त्वरित लागू करणे
बदली धोरण, EPF, विमा योजना लागू करणे
शैक्षणिक पात्रतेनुसार वेतन सुसूत्रीकरण व जुन्या-नव्या कर्मचाऱ्यांतील तफावत दूर करणे
सेवेत मृत्यू झाल्यास ५० लाख व अपंगत्व आल्यास २५ लाख सानुग्रह अनुदान