NCP Politics : अजित पवारांच्या ‘त्या’ भेटीने राजकीय चर्चांना उधाण !

Ajit Pawar’s ‘that’ visit sparks political discussions : राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क

Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काल (२१ ऑगस्ट) पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी वर्धा येथे आढावा बैठक घेतली आणि नागपुरात गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. दरम्यान शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते सलील देशमुख यांची भेट घेतली. यावेळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेसुद्धा उपस्थित होते.

सलील देशमुख प्रकृती अस्वास्थ्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे अजित दादांनी त्यांची भेट घेतली आणि प्रकृतीची विचारपूस केली. असे असले तरी राजकीय वर्तुळात चर्चा न झाली तर नवलच. या भेटीचेही अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. ही भेट केवळ आणि केवळ तब्येतीची चौकशी करण्यासाठी असली तरी राजकीय जाणकार आपआपल्या पद्धतीने त्याचे अर्थ लावताना दिसत आहेत.

Vice Presidential Election : तुम्हाला क्रॉस वोटिंग ची भीती आहे का ?

पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या मेळाव्यात अजित पवारांनी कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र दिला. ते म्हणाले की, घरी बसून निवडणुकीत विजय मिळणार नाही. त्यासाठी लोकांमध्ये जावे लागेल, त्यांच्या मिसळावे लागेल, लोकांना आपलेसे करून घ्यावे लागेल तेव्हा कुठे निवडणुकीत विजय मिळेल. जो कार्यकर्ता पक्षासाठी सकारात्मक काम करेल, त्याच्याच नावाचा विचार निवडणुकीत उमेदवारीसाठी केला जाईल. चांगले काम करणाऱ्याच्या कामाचे काऊंटींग पक्ष पातळीवर सुरू असते. अशा कार्यकर्त्याला संधी मागावी लागत नाही, तर पक्ष स्वतःहून त्याचा विचार करतो, असेही अजित पवार यांनी सांगितले.

Revenue Department : पांदण रस्त्यांचा अभ्यासगट बदलवणार शेतकऱ्यांचे जीवनमान !

मेळाव्याला आमदार राजकुमार बडोले, आमदार राजु कारेमोरे, आमदार संजय खोडके, माजी मंत्री नाना पंचबुद्धे, पक्षाचे निरीक्षक राजेंद्र जैन, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिरकर, शहराध्यक्ष प्रशांत पवार, शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, बाबा गुजर, आभा पांडे यांच्यासह पूर्व विदर्भातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.