Breaking

NDRF centre in Nagpur : संकटांशी दोन हात करण्याचे प्रशिक्षण नागपुरातून !

Training to deal with disasters will be in Nagpur : ‘एनडीएफआरएफ’चे केंद्र साकारणार सुराबर्डीत

प्रत्यक्ष प्रतिसाद देणारी यंत्रणा म्हणून २००६ मध्ये एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) सक्रीय झाले. देशभरातील १६ बटालियनपैकी पुण्यात असणाऱ्या बटालियनची एक चमू नागपुरात तैनात असते. आता सुराबर्डी येथे प्रशिक्षण केंद्र झाल्यानंतर एनडीआरएफला बळ मिळणार आहे. मोठ मोठ्या आपत्तीशी लढण्याचे प्रशिक्षण येथे देण्यात येईल.

मोठ्या प्रमाणात आलेली नैसर्गिक आपत्ती क्षणात सर्व उद्ध्वस्थ करू शकते. अशा आपत्तीशी लढण्यासाठी कुठलीही स्वतंत्र यंत्रणा नव्हती. पोलिस, जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था यांच्याकडूनच मदत पुरविली जात होती. दरम्यानच्या काळात मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली. यातूनच जन्म झाला एनडीआरएफचा.

अनेक संकटांशी दोन हात करून त्यांनी आतापर्यंत आपला जीव धोक्यात टाकून अनेकांचे प्राण वाचविले. एनडीआरएफमध्ये सीआरपीएफ, आयटीबीपी, बीएसएफ, सीआयएसएफ येथून अधिकारी-कर्मचारी नेमले जातात. एनडीआरएफमध्ये महिलाही कार्यरत आहेत.

Local Body Elections : पंचायत समिती सभापतीची निवड दृष्टीपथात!

गृहमंत्रालयानंतर्गत कार्य करणारे एनडीएमए (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) अस्तित्वात आले. राष्ट्रीय पातळीवरील आपत्तीचे व्यवस्थापन करणारी यंत्रणा म्हणून ती ओळखली जाऊ लागली. राष्ट्रीय पातळीवर धोरण ठरविण्याचे कामही एनडीएमए करते. याच धर्तीवर राज्य पातळीवर एसडीएमए आणि जिल्हा पातळीवर डीडीएमए अस्तित्वात आले. त्यानंतर प्रत्यक्ष प्रतिसाद देणारी यंत्रणा म्हणून २००६ मध्ये एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) आणि २०१६ मध्ये एसडीआरएफची (राज्य आपत्ती प्रतिसाद दल) स्थापना करण्यात आली.

संपूर्ण देशात एनडीआरएफच्या १६ बलालियन कार्यरत आहे. महाराष्ट्रात पुण्यात ही बटालियन असून यातील एक चमू नागपुरात विदर्भासाठी तैनात असते, त्याअंतर्गत २२ चमू कार्यरत आहेत. एका बचाव पथकात ४७ बचावकर्मी कार्यरत असतात. कोणत्या आपत्तीच्या वेळी धावून जायचे याची कार्यपद्धती ठरविण्यात आली आहे.

ज्या घटनेत जीवित, वित्तीय नुकसान होते, त्याचा परिणाम मानवी समुदायावर होतो, असे नुकसान टाळण्यासाठी या चमू तैनात केल्या जातात. भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तीतच नाही तर रेल्वे अपघात, औद्योगिक अपघात, बॉम्बस्फोट, चेंगराचेंगरी, इमारत पडणे, सीबीआरएन अपघात (केमिकल, बायलॉजिकल, रेडिओलॉजिकल, न्युक्लिअर) अशा घटना घडल्यानंतरही या चमू मदतीसाठी धावून जातात.

Mahayuti Government : भंडाऱ्याचा कारभार १९१ किलोमीटर लांबून !

२०१९ मध्ये मध्यप्रदेशात आलेल्या पूरस्थितीमुळे चौराई धरणाचे पाणी सोडण्यात आले होते. यामुळे पेंच आणि कन्हान नदी तिरावरील ६० गावांना धोका निर्माण झाला होता. एनडीआरएफ आणि एसडीआरएफने बचाव अभियान राबवून ६ हजार १२३ लोकांना सुखरूप बाहेर काढले, एनडीआरएफचे जवान आमच्यासाठी देवदूत ठरले, अशी भावना नागरिक व्यक्त करतात.