Breaking

New disease after hair loss : शेगावमध्ये आता नखं गळतीची साथ!

Nail fall epidemic in Shegaon : चार गावात २९ रुग्ण, आरोग्य विभागात खळबळ

Khamgao शेगाव तालुक्यात केस गळतीच्या प्रकरणांनंतर आता नखं गळतीची साथ उद्रेकत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील चार गावांमध्ये सध्या २९ रुग्णांमध्ये नखं गळतीचे लक्षणे आढळून आली आहेत. त्याची आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे.

डिसेंबर २०२४ पासून शेगाव, नांदुरा आणि खामगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांना अचानक केस गळतीचा त्रास जाणवू लागला होता. आता याच रुग्णांमध्ये नखे कमजोर होणे, विद्रूप होणे आणि अखेर गळून पडण्याच्या घटना घडत आहेत. परिणामी, या नवीन साथीकडे नागरिक भीतीने पाहत आहेत.

Water shortage in Akola : अकोल्यात पाणी पेटले; ठाकरे गटाची महापालिकेत तोडफोड

बुलढाण्याचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण चार गावांमध्ये नखं गळतीची समस्या असलेले २९ रुग्ण सध्या आढळून आले आहेत. रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, या समस्येमागे सेलेनियमचे वाढलेले प्रमाण कारणीभूत असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. पुढील तपासणीसाठी आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. पथक स्थापन करून अधिक माहिती गोळा केली जात आहे.

Churmura Grampanchayat : पाणी द्या, नाहीतर फाशी घेतो; गावकऱ्यांनी उपसरपंचांना कोंडले

या नवीन लक्षणांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाकडून पाणी, अन्न आणि परिसरातील इतर घटकांची तपासणी सुरू आहे. आरोग्य विभागाकडून जनजागृतीसह आवश्यक उपाययोजनाही करण्यात येत आहेत.