NIT, Nagpur Municipal Commissioner : थंडीच्या दिवसांत पहाटे पाचला उद्यानात कोण येणार ?

Demand to keep parks open all day : दिवसभर खुली ठेवा उद्याने; जनमंच संघटनेची प्रशासनाकडे मागणी

Nagpur मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या नागपूर शहरात लाखोंच्या घरात आहे. यात विशेषतः फिटनेसबद्दल सजग असलेले लोक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा ओढा उद्यानांकडे असतो. पण उद्याने पहाटे पाचला सुरू होतात आणि सकाळी नऊला बंद होतात. थंडीच्या दिवसांमध्ये लोक उद्यानात पोहोचतात तेव्हा ते बंद झालेले असते. अशात या दिवसांमध्ये पहाटे पाचला उद्यानात कोण येणार, असा प्रश्न लोक विचारत आहेत. त्यावर दिवसभर उद्याने सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.

निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालविणारे हक्काचे ठिकाण असलेली शहरातील सार्वजनिक उद्याने केवळ अल्पकाळच सुरू असतात. मुंबईप्रमाणे दिवसभर उद्यानांची दारे उघडी असावी, अशी मागणी जनमंच संघटनेकडून महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली. शहरातील सार्वजनिक उद्याने सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत अशी उघडी असतात.

CM Devendra Fadnavis : नवेगाव बांधमधील ‘पर्यटक निवास’ ठरणार आकर्षण

उद्यान अधीक्षकांकडून तशा स्वरूपाच्या सूचना उद्यान परिसरात लावण्यात आल्या आहेत. मात्र थंडीच्या काळात अनेक ज्येष्ठ नागरिक ९ नंतरच उद्यानाकडे वळतात. मात्र तिथे गेल्यानंतर सुरक्षा रक्षकांकडून त्यांना प्रवेश नाकारण्यात येतो. उद्यानाची वेळ संपली असे सांगून दारे बंद केली जातात. शहरातील नागरिकांना धावपळीच्या जीवनातून निवांत क्षण उपलब्ध करून देणारे ठिकाण दिवसभर सुरू ठेवायला हवे. उद्यानांमध्ये ग्रीन जिमची व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र उद्याने बंदच असल्याने त्याचा वापर अनेक नागरिकांना करताच येत नाही.

महापालिकेच्या उद्यान विभागाच्या या जाचक नियमांमुळे नागरिक आणि प्रशासनांमध्ये वारंवार वाद निर्माण होतात. जनतेच्या पैशांतून तयार करण्यात आलेली उद्याने जनतेच्या सोईनुसारच सुरू राहायला हवी, अशी मागणी जनमंचने केली आहे. संघटनेचे अध्यक्ष राजीव जगताप, महासचिव विठ्ठल जावळकर, उपाध्यक्ष अॅड. मनोहर रडके, प्रल्हाद खरासने, मोहन शिंदे, टी. बी. जगताप, रमेश बोरकुटे, प्रा. शरद पाटील यांनी याकडे लक्ष वेधलं आहे.

मुंबईत आहे, तर नागपुरात का नाही?
मुंबईतील सगळी सार्वजनिक उद्याने दिवसभर खुली असतात. तिथे दिवसभरात लोक आपल्या सोयीने फिरायला येतात. नागपूर हे मेट्रोसिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे, असे म्हणता. मग मुंबईप्रमाणेच नागपुरातही दिवसभर उद्याने सुरू ठेवायला काय हरकत आहे, असा सवाल महापालिकेला विचारण्यात आला आहे.