Breaking

Nitin Gadkari in Advantage Vidarbha : विदर्भात साडेसात लाख कोटींची गुंतवणूक

 

Investment of seven and a half lakh crores in Vidarbha : खासदार औद्योगिक महोत्सवाचा समारोप

Nagpur अत्यंत यशस्वी अश्या खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या आवृत्तीमधून विदर्भात साडेसात लाख कोटींची गुंतवणूक झाल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

गडकरींच्या संकल्पनेतून नागपुरात आयोजित खासदार औद्योगिक महोत्सव Advantage Vidarbha चा समारोप झाला. त्यावेळी गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती. असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात हा महोत्सव आयोजित करण्यात आला.

CM Devendra Fadnavis : ‘विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटी’साठी 100 एकर जागा

यावेळी खासदार प्रफुल पटेल, आ. चित्रा वाघ, आ. चरणसिंग ठाकूर, आ. चैनसुख संचेती, माजी खासदार विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, उद्योग सचिव पी. अनबलगन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालक मनोज सूर्यवंशी, आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मैत्री आदींची उपस्थिती होती.

विविध प्रकल्पांमधून साडे सात लाख कोटींची गुंतवणूक विदर्भात होत आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात जगात सर्वात उत्तम दर्जाचे लोहखनिज आहे. त्यामुळे नजीकच्या जिल्ह्यात मोठमोठे उद्योग सुरु होतील. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नागपूरच्या एमआरओमध्ये बोईंगचे काम सुरू आहे. नागपूर एव्हिएशन हब होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

Uday Samant : कर्मचारी हाच एमआयडीसीचा कणा !

विदर्भात नागपूर -बुटीबोरी दरम्यान स्कील युनिव्हर्सिटी तयार करण्याचा प्रस्ताव गडकरींनी दिल्याबद्दल केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी कौतुक केले. या अर्थसंकल्पात देशात १०० प्लग अँड प्ले औद्योगिक क्षेत्र तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात महाराष्ट्र आघाडीवर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एआयडी अध्यक्ष आशीष काळे यांनी केले. आयोजन समिती अध्यक्ष अजय संचेती, खासदार प्रफुल पटेल यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. प्रारंभी खासदार औद्योगिक महोत्सवावर आधारित माहितीपट दाखविण्यात आला. तत्पूर्वी विदर्भातील सुवर्णकार यांनी फडणवीस यांचा सत्कार केला महोत्सवाला सुमारे १ लाख २५ हजार नागरिकांनी भेट दिली.

आर्टिफिशियल इलेक्ट्रॉनिक्स इंटेलिजंट मटेरियल लिमिटेड हे नागपुरात इलेक्ट्रॉनिक सेमीकंडक्टर क्षेत्रात नागपुरात १० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. यातून ५०० रोजगार निर्मिती होणार आहे. राज्य शासनाकडून उद्योग सचिव पी. अनबलगन यांनी हा करार केला. श्रेम ग्रुप ऑफ कंपनीज बायोइंधन क्षेत्रात विदर्भात ८०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यातून १०० रोजगार निर्माण होणार आहे. ओलेक्ट्रा इव्हीचे चेयरमन के. व्ही. प्रदीप यांनी नागपुरातील आगामी गुंतवणुकीबद्दल माहिती दिली. हा सामंजस्य करार दावोस मध्ये झाला होता.