Breaking

Nitin Gadkari : सत्तेत आल्यावर लोक अहंकारी, गर्विष्ठ होतात सन्मान मागितल्याने मिळत नाही !

Union Minister Nitin Gadkari’s strong attack :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जोरदार फटकेबाजी

Nagpur : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सडेतोड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी नागपूरमध्ये एका कार्यक्रमात तुफान फटकेबाजी केली आहे. सत्तेत आल्यावर लोक अहंकारी, गर्विष्ठ होतात. सन्मान करण्यासाठी मिळत नाही, असा खणखणीत टोला गडकरींनी लगावला आहे. त्यांच्या भाषणाची जोरदार चर्च आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सडेतोड विधानाने राजकारणात वणवा पेटतो हे अनेकदा पाहायला मिळाले आहे. शनिवारी नागपूरमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी प्राचार्य आणि शिक्षकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सत्ता, संपत्ती, पैसा, ज्ञान आणि सौंदर्य प्राप्त झाल्यावर लोक नेहमी अहंकारी होतात. ते गर्विष्ठ होतात, असे ते म्हणाले. ज्यावेळी लोकांच्या लक्षात येते की, ते सर्वात बुद्धिमान आहेत. तेव्हा इतरांवर हक्क गाजवण्याची त्यांची प्रवृत्ती वाढते, असे ते म्हणाले. सन्मान मागितल्याने मिळत नाही, असा टोला गडकरींनी लगावला.

Sanjay Raut : मी भाजपमध्ये येतो, मला मुख्यमंत्री करा शिंदेंचा अमित शहांना प्रस्ताव !

स्वत:ला लादून कोणी महान होऊ शकत नाही, इतिहासात डोकावून पहा. ज्यांना लोकांनी स्वीकारले आहे, त्यांना स्वत:ला लादण्याची गरज पडली नाही, अशी फटकेबाजी त्यांनी केली. त्यांच्या वक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे. गडकरी यांनी नेत्यांच्या अहंकारी वृत्तीवर नाराजी व्यक्त केली. मी सर्वात बुद्धिमान आहे. मी साहेब झालो आहे, मी दुसर्‍याला गिनतच नाही, त्याला मोजत नाही, असा चिमटा ही त्यांनी अशा नेत्यांना काढला. त्यांनी सध्याची भीषण वास्तवता समोर आणली आहे.

Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, ‘प्राचार्य म्हणजे नेतृत्वाची परीक्षा’

कार्यक्रमात त्यांनी, तुम्ही तुमच्या जवळील, तुमच्या हाता खालील, कनिष्ठांसोबत कसा व्यवहार करता, त्यावर तुमचे खरे नेतृत्वगुण कळतात. सन्मान, गौरव हा मागून मिळत नाही. ते तुमच्या कर्मावरून मिळतो, असे विधान गडकरी यांनी केले. गडकरी यांच्या विधानाने राजकारणा खळबळ उडाली. गडकरी यांनी नागपूरमधील शिक्षक भरती घोटाळ्यावर सुद्धा फटकेबाजी केली. अनेक शिक्षकांची नियुक्ती ही लाच देऊन करण्यात आल्याचे म्हणले. या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना कानपिचक्या असल्याचा दावा माजी मंत्री नितीन राऊत यांनी केला. गडकरी यांचे सडेतोड वक्तव्य हे भाजपातंर्गत असलेला अहंकार आणि आत्मकेंद्रित वृत्तीवर थेट प्रहार असल्याचे नितीन राऊत म्हणाले.