Leaders are accused of spending time in gossiping : एकमेकांवर कुरघोडी करण्यात वेळ घालवल्याचा नेत्यांवर आरोप
Nagpur विधानसभेच्या पराभवावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घरचा अहेर दिला. आणि आता माजी मंत्री नितीन राऊत हेदेखील समोर आले आहेत. त्यांनी तर मविआच्या प्रमुख नेत्यांवर थेट एकमेकांवर कुरघोडीतच वेळ घालविल्याचा आरोप केला आहे. यामुळे काँग्रेसकडून वेगळी चूल मांडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत की काय, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
नितीन राऊत यांनी काँग्रेस व मविआच्या नेत्यांवर मोठे आरोप केले आहेत. लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात मिळालेल्या यशानंतर मविआच्या नेत्यांनी राजकीय स्थितीकडे दुर्लक्ष केले. मविआच्या नेत्यांनी त्यावेळी केवळ वाटाघाटींमध्ये वेळ घालविला. संघटनात्मक बांधणीकडे व विधानसभा निवडणूक या मुद्द्यांना गांभीर्याने घेतलेच नाही. त्यामुळे निवडणूकीत दारूण पराभव झाला. आमचे नेते मुख्यमंत्रीपदावरून वाद घालत होते. वाटाघाटींमध्ये एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न होत होता. मात्र विधानसभेच्या अगोदर कुणालाही तळागाळात पोहोचण्यात यश आले नाही हे मान्य करावे लागेल, अशी कबुली राऊत यांनी दिली.
Ajit Pawar will ask Dhananjay Munde to resign : ..तर अजित पवार घेतील धनंजय मुंडेंचा राजीनामा !
काँग्रेसमध्ये लवकरच हाय कमांडकडून संघटनात्मक बदल केले जातील असे संकेत राऊत यांनी दिले. विधिमंडळ पक्षनेता, विधानसभा गटनेता आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष या तिन्ही पदांसाठी हाय कमांडकडून लवकर निर्णय होतील, अशी अपेक्षा आहे. याबाबतचा प्रस्ताव हायकमांडला गेला आहे व तो त्यांच्या विचाराधीन आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीबाबत तयारीबाबत तेथूनच सूचना येतील, असे त्यांनी सांगितले.
वडेट्टीवार काय म्हणाले?
निवडणूकीसाठी तिन्ही पक्षांना संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही. ही अनेक कारणे पुढे आली. त्यामुळे जागावाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका आम्हाला नक्की बसला. इतका वेळ घालवण्यामध्ये काहीतरी षडयंत्र होते का, असा सवाल मनात येत आहे. बैठकीची वेळ ११ वाजता असायची आणि अनेक नेते दोन वाजता यायचे. त्यात मी कोणाचे नाव घेणार नाही. पण यामुळे बैठकांचा वेळ लांबत गेला. एका जागेवर वारंवार त्याच त्या गोष्टी होत गेल्या, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी आपल्या नेत्यांवर केली.