OBC Reservation : खूप झाली आंदोलने, आता बेमुदत उपोषण!

OBC community will be on indefinite fast from today : अकोल्यात ओबीसी समाज एकवटणार, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

Akola राज्यातील ओबीसी समाजाला न्याय मिळावा, त्यांचे संवैधानिक हक्क अबाधित राहावेत, तसेच ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयीन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, या मागण्यांसाठी अकोल्यात बेमुदत उपोषणाला आजपासून सुरुवात होत आहे. जिल्हा ओबीसी प्रतिनिधींच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू होणार असून, जिल्ह्यातील विविध समाजघटक, संघटना आणि नागरिकांचा या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्याच्या राजकारणात गाजत आहे. विविध पातळीवर आंदोलने, मोर्चे आणि धरणे आंदोलनांनंतरही शासनाने ठोस निर्णय न घेतल्याने ओबीसी समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा ओबीसी प्रतिनिधींनी बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.

Relief for construction workers : बांधकाम कामगारांना दिलासा, आता चार उपकेंद्रांवर गृहोपयोगी संच वाटप

उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले आहे की, ओबीसी समाजावरील अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आरक्षणाचे रक्षण होईल, याची खात्री शासनाने तातडीने द्यावी. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांकडून देण्यात आला आहे. शासनाला दबाव आणण्यासाठी आणि प्रश्न निकाली निघावा म्हणून हे उपोषण बेमुदत सुरू ठेवले जाणार आहे.

या उपोषणाला केवळ ओबीसी समाजच नव्हे, तर इतरही समाजघटकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. ओबीसी नेते, विविध संघटना, विद्यार्थी, युवक-युवती तसेच महिलांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहून उपोषणकर्त्यांचे मनोबल वाढवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Anti curroption bureau: तहसीलदाराला दाेन लाखांची लाच घेताना पकडले, शंका येताच पैसे फेकले शाैचालयात

उपोषणकर्त्यांनी केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, “ओबीसी समाजाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी एकजुटीची गरज आहे. हे बेमुदत उपोषण हा न्यायासाठीचा लढा आहे. अकोल्यातील सर्व नागरिक, कार्यकर्ते आणि समाजघटकांनी १५ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहून आंदोलनाला बळ द्यावे.”