Oppose to member registration campaign within BJP in Akola : भाजप सदस्य नोंदणी अभियानाला पक्षातूनच विरोध
Akola केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ते बघता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग झाल्यास वाटेकरी वाढतील. मूळ पक्षातील एकनिष्ठ सदस्यांना डावलले जाण्याची भीती आहे. केवळ सत्तेसाठी पक्ष प्रवेश देऊ नये, असा सूर भाजपच्या बैठकीत उमटला.
भाजपमधील संभाव्य इनकमिंगला कार्यकत्यांनीच तीव्र विरोध सुरू केला आहे. केवळ सत्तेसाठी पक्ष प्रवेश देऊ नये, असा सूर भाजपच्या बैठकीत उमटला आहे. एकीकडे राज्यभरात सदस्य नोंदणी अभियान जोरात सुरू आहे. त्यात आता पक्षातूनच विरोधाचा सूर उमटल्याने नेत्यांकडून चिंता व्यक्त होत आहे.
Devendra Fadnavis on Mahametro : पुणेकरांना ‘नागपूर’बद्दल शंका होती !
अनेक कार्यकर्त्यांनी आयातीवर आक्षेप घेतला. आगामी महापालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीच्या हालचालींना वेग आला आहे. रविवारी अकोल्यात २२७ ठिकाणी भाजपने सदस्य नोंदणी अभियानही राबवले. पदाधिकारी होण्यासाठी प्रत्येक सभासदाला ५०० सदस्य करणे आवश्यक राहणार आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर आता कार्यकत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांकडे कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून पाहिले जाते.
महापालिका, नगर परिषदेचा कार्यकाळ दोन वर्षांपूर्वीच संपला आहे. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यादृष्टीने रविवारपासून भाजपने सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ केला. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ‘एक दिवस संघटनेला’ या अभियानांतर्गत सदस्य नोंदणीला गती देण्याचे काम सुरू करण्यात आले. अकोला येथे आमदार रणधीर सावरकर यांनी २६ ठिकाणी भेटी देऊन कार्यकत्यांशी संवाद साधला.
Sudhir Mungantiwar : ऑक्सीजनला मिटर लागलं, तर आपलं काही खरं नाही !
काँग्रेस, भाजपमध्ये चुरस वाढणार
अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत २०१७मध्ये ८० पैकी भाजपला ४८, काँग्रेस १३, राष्ट्रवादी काँग्रेस ५, शिवसेना ८, एमआयएम १, वंचित ३ व दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. त्यावेळी अकोला शहरातील दोन्ही मतदारसंघात भाजपचे आमदार होते. आता मात्र शहरी भाग असलेल्या विधानसभेच्या अकोला पश्चिममध्ये काँग्रेसचा आमदार आहे. लोकसभेतही पश्चिममध्ये काँग्रेसलाच भाजपपेक्षा जास्त मते मिळाली होती. त्यामुळे मनपा निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
सत्ता उपभोगासाठी प्रवेश नको
अन्य पक्षातून केवळ सत्तेसाठी येणाऱ्यांना पक्ष प्रवेश नको, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आयात उमेदवार असल्यास संधीमध्ये वाटेकरी वाढणार आहेत. आपल्याच परिसरात भविष्यातही हे आयात उमेदवाराच्या रुपाने नेतृत्व उभे झाल्यास राजकीय प्रवास बिकट होईल, असा सूरही कार्यकर्त्यांमध्ये उमटला आहे.