Breaking

Padalkar vs Jayant Patil : ‘दिवा विझताना मोठा होतो’ तसं जयंत पाटलांचं झालंय !

‘Release me from responsibility’ statement sparks criticism : ‘जबाबदारीतून मुक्त करा’ या वक्तव्यावरून जहरी टीका !

Kolhapur : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, वर्धापन दिन सोहळ्यात ‘प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा’ अशी मागणी केली होती. यावरभाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी तिखट शब्दांत टीका केली. जयंत पाटील यांचे राजकारण संपत आले आहे. दिवा विझताना मोठा होता. तशी सध्या त्यांची अवस्था झाली आहे, असे पडळकर यांनी म्हणले आहे.

कोल्हापूर येथील सभेत बोलताना गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर ही जहरी टीका केली. त्यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची गोष्ट मला सिरीयस वाटत नाही. ते जबाबदारीपासून का पळ काढत आहेत हे मला माहिती नाही. जयंतराव हा राजकारणातला संपलेला विषय आहे. सतत जाळ घालून मोठा करण्याचा प्रयत्न केला तरी काय उपयोग होणार नाही. दिवा विझताना मोठा होतो, तशी अवस्था जयंत पाटील यांची झालेली आहे. जयंत पाटील हा अनुकंपा तत्त्वावर राजकारणात भरती झालेला कार्यकर्ता आहे.

Liquor duty hike : गरिबांची देशी पोचली 80 वर, मद्यप्रेमींची चिंता वाढणार

जयंत पाटील यांनी कुठलाही संघर्ष केला नाही. कुठलाही मोठा प्रकल्प सांगलीसाठी आणला नाही. इतके वर्षे व्हीआयपी कॅबिनेट म्हणून ते राहिले होते. सायकल पंक्चर झाल्यानंतर पंक्चर काढता येते. मात्र, टायर फुटल्यानंतर टायर पूर्णपणे बदलावा लागतो, तशीअवस्था जयंत पाटील यांच्याबाबत झाली आहे, अशी टीकाही पडळकर यांनी केली.

Ajit Pawar NCP : २५ हजार कार्यकर्ते राष्ट्रवादीत करणार प्रवेश

जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नव्या प्रदेशाध्यपदाबाबत सध्यातरी निर्णय घेतलेला नाही. शरद पवारांनी स्पष्टपणे कालच्या कार्यक्रमात आगामी पालिका निवडणुकानंतर नव्या प्रदेशाध्यपदाबाबत निर्णय होईल, असं सांगितलं आहे.

  • सचिन काटे (विशेष प्रतिनिधी)

    २७ वर्षांपासून विविध राज्यस्तरीय दैनिकांमध्ये रिपोर्टरपासून कार्यकारी संपादक पर्यंतचा विस्तृत अनुभव. डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात ही यशस्वी योगदान.