BJP alleges that Congress has organized several yatras in the name of Sevagram : निवडणुका आल्या की त्यांना संविधान आठवते
Nagpur : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नागपुरातील दिक्षाभूमी ते वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम अशी संविधान पदयात्रा काढली आहे. यामध्ये मुख्यत्वे करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नागपूर शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरदचंद्र पवार) माजी गृहमंत्री अनिल देशमुख सहभागी झाले. या यात्रेवर राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी ताशेरे ओढले आहेत. निवडणुका आल्या की काँग्रेसला संविधान आठवते, असा खोसक टोला त्यांनी लगावला आहे.
राज्यमंत्री भोयर यांनी काल (३० सप्टेंबर) नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सेवाग्रामच्या नावाने काँग्रेस पक्षाने यापूर्वीदेखील अनेक यात्रा काढल्या. मात्र सेवाग्रामचा खरा इतिहास काय, हे वर्धा जिल्ह्यातील आणि एकुणच देशातील जनतेला माहिती आहे. त्यामुळे अशा कितीही यात्रा काढल्या तरी त्याचा परिणाम लोकांवर होणार नाही. प्रत्येक वेळी निवडणुका आल्या की त्यांना संविधान आठवते. पण संविधानाने दिलेली जी घटना आहे, तशी त्यांची वागणूक नाही. ते जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. एखाद वेळी त्यांना यश मिळालंही असेल. पण आता मिळणार नाही.
Dhammachakra Pravartan Din : पाऊस आल्यास शाळा व वसतिगृहांमध्ये राहण्याची व्यवस्था !
शालार्थ आयडी घोटाळ्याबाबत विचारले असता, या घोटाळ्यातील शिक्षकांचे दस्तावेज अद्याप आलेले नाहीत. याचा संपूर्ण अहवाल मागवला आहे. संपूर्ण कागदपत्र आल्यावर कारवाई केली जाईल. शालार्थ आयडी घोटाळ्यासंदर्भात राज्यस्तरावर एसआयटी गठीत करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे. ज्यांचा घोटाळ्याशी काहीही संबंध नाही, त्या शिक्षकांचा पगार सुरू ठेवावा, अशा स्पष्ट सुचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. सुरूवातीला हा घोटाळा केवळ नागपूरपुरता मर्यादित होता. पण नंतर याची पाळेमुळे राज्यभर पसरली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय एसआयटी नेमली आहे, असे डॉ. भोयर म्हणाले.








