Chronology of the revolver case of Ghayval revealed : घायवळच्या रिव्हॉल्व्हर प्रकरणाची क्रोनोलॉजी उलगडली
Mumbai : राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर ठाकरे गटाने जोरदार हल्लाबोल केला आहे. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन याला पोलिसांचा नकारात्मक अहवाल डावलून शस्त्र परवाना मंजूर केल्याच्या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी कदम यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. परब यांनी सचिन घायवळच्या रिव्हॉल्व्हर परवान्याची संपूर्ण “क्रोनोलॉजी” उलगडत योगेश कदम यांनी नियम आणि कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
या वादाची पार्श्वभूमी रामदास कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्याशी जोडली जात असून, ठाकरे गटाने त्यांच्या पुत्रावर म्हणजेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर राजकीय आघाडी उघडली आहे.
Andhare Vs kadam : योगेश कदमांकडून गुंडाला अभय सुषमा अंधारेंकडून पोलखोल
अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सचिन घायवळ हा कुख्यात गुंड निलेश घायवळचा सख्खा भाऊ असून, त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि मोक्का अंतर्गत गंभीर गुन्हे नोंद आहेत. पोलीस तपासणीदरम्यान घायवळची गुन्हेगारी पार्श्वभूमी स्पष्ट झाली होती, त्यामुळे पोलिसांनी त्याला शस्त्र परवाना नाकारला होता. तथापि, घायवळने अपील करत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे अर्ज दाखल केला.
OBC hostel : ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांसाठी तत्काळ जागा शोधा
परब म्हणाले, शस्त्र परवाना मिळवण्याची प्रक्रिया ठरावीक आहे. पोलिसांचा अहवाल, व्यक्तीची पार्श्वभूमी आणि समाजातील प्रतिमा यावर निर्णय घेतला जातो. पण या प्रकरणात गृहराज्यमंत्री कदम यांनी पोलीस आयुक्तांचा अहवाल नाकारून थेट शस्त्र परवाना मंजूर केला. हे केवळ नियमभंग नाही, तर गुन्हेगारीला अभय देण्यासारखे आहे.”
त्यांनी पुढे आरोप केला की, राज्य सरकारमधील काही मंत्री गुंडांना पोसत आहेत. हे मंत्री आईच्या नावाने डान्सबार चालवतायत, मुली नाचवून पैसे कमावत आहेत आणि आता गुंडांना अधिकृत शस्त्र परवाने देतायत. मुख्यमंत्री फडणवीस अशा मंत्र्यांना आपल्या सोबत का ठेवत आहेत? हे राज्य सरकारचं अपयश आहे.
Local Body Elections : बुलढाणा, खामगाव, चिखलीत ‘हायप्रोफाइल’ लढत?
अनिल परब यांनी स्पष्ट इशारा दिला की, मी मुख्यमंत्री यांना भेटून कदम यांच्या हकालपट्टीची मागणी करणार आहे. लोकायुक्त आणि न्यायालयाकडेही जाणार आहे. पण आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची जबाबदारी घ्यावी. अधिवेशनात हा मुद्दा मी ठामपणे मांडणारच आहे आणि शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.
ते पुढे म्हणाले, योगेश कदम यांनी पोलिसांचा ‘गुन्हे नाहीत’ हा अहवाल दाखवून पळवाट काढली आहे. पण तो अहवाल अपूर्ण आहे, कारण त्याच पोलिसांनी सचिन घायवळची गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील नमूद केली आहे. अशा गुंडाच्या भावाला शस्त्र परवाना देणे म्हणजे सरकारचा नाक कापणे आहे.
दरम्यान, राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या समाज माध्यमावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “शिक्षक आणि व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते. न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाच्या आधारे, नियमानुसार निर्णय घेण्यात आला.
Uddhav Balasaheb Thackeray : शेतकऱ्यांसाठी ठाकरे सेना रस्त्यावर, सरकारवर हल्ला
कदम पुढे म्हणाले, या अपील प्रकरणाचा सध्या चर्चेत असलेल्या इतर प्रकरणांशी काहीही संबंध नाही. माझ्या कारवाईला त्याच्याशी जोडणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारला कोंडीत पकडले आहे, तर भाजपने कदम यांच्या समर्थनार्थ स्पष्टीकरण देत विरोधकांच्या आरोपांना राजकीय हेतूप्रेरित म्हटले आहे. आता मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका काय राहते आणि योगेश कदम यांच्याविरोधात पुढील कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
____