Pawar Vs Bawankule : जाहिराती कुणी दिल्या ते जाहीर करा !”

Rohit Pawars attack on Bawankule : रोहित पवारांचा बावनकुळेंवर हल्लाबोल

Mumbai : राज्यातील जाहिरातबाजीवरून नवा वाद पेटला आहे. भाजप नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट निशाणा साधला आहे. कोट्यवधींच्या निनावी जाहिरातींवरून पवारांनी सरकार, भाजप आणि बावनकुळे यांना सवालांचा भडिमार केला आहे.

रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट आणि माध्यमांद्वारे बावनकुळे यांना उद्देशून म्हटलं आहे की, “साहेब, तुम्ही रोज ४० कोटी नव्हे तर ४०० किंवा ४००० कोटींच्या जाहिराती छापा, आम्हाला काही आक्षेप नाही. पण या जाहिराती निनावी का दिल्या, याबद्दल प्रश्न आहे. निनावी जाहिरात म्हणजे उपकाराची परतफेड असते, हे तुम्हाला ठाऊक असेल.”

Local Body Elections : जिल्हाधिकाऱ्यांनी आक्षेपकर्त्यांचे व मुख्याधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले; सहा आक्षेप मान्य

ते पुढे म्हणाले, “या जाहिराती सरकारने दिल्या असतील तर मग एकीकडे निधीअभावी योजना बंद केल्या जात आहेत, कंत्राटदारांची बिले थकली आहेत आणि आत्महत्या होत आहेत, अशावेळी जाहिरातींवर कोट्यवधींची उधळपट्टी का? जर भाजपने जाहिराती दिल्या असतील तर मग आपल्या नावाने दिल्या का नाहीत? आणि जर एखाद्या कंपनीने किंवा मित्रपक्षातील अडचणीत सापडलेल्या नेत्याने उपकाराची परतफेड म्हणून या जाहिराती दिल्या असतील, तर तेही स्पष्ट करायला हवं.”

Vidarbha Farmers : जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या!

रोहित पवारांनी यामध्ये थेट आरोप करत विचारलं की, “बावनकुळे साहेब, महसूलमंत्री असताना तुम्ही ज्या कंपनीचा ९० कोटी रुपयांहून अधिक दंड माफ केला, त्या कंपनीनेच ही जाहिरात दिली का?”

शेवटी त्यांनी जाहीर आव्हान दिलं की, “या प्रकरणात काहीही काळेबेरं नसेल, काहीही लपवण्यासारखं नसेल तर कोट्यवधींच्या जाहिराती कुणी दिल्या, हे तुम्ही स्पष्ट करा. करा जाहीर!”

Ladki Bahin Scheme : ‘लाडकी बहीण’ घोटाळा, ६१ हजार महिलांचे भवितव्य ठरणार आठवडाभरानंतर

या हल्लाबोलामुळे भाजप-केंद्रित जाहिरात मोहिमेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं असून, पवारांच्या टीकेनंतर या वादाला आणखी धार मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

____