Police arrested the abductor of the minor girl : अल्पवयीन मुलीला पळविले; आरोपी गजाआड
Girl वासनेच्या आहारी गेलेली माणसे कोणत्याही थरापर्यत जाऊ शकतात, याचा प्रत्यय नुकताच आला आहे. आधीच दोन मुले असताना एकाने चक्क अल्पवयीन मुलीस पळविले. तसेच तिच्यासोबत शारीरीक संबंधही ठेवले. या प्रकरणी वाशिम जिल्ह्यातील नावाली येथील अमोल विजय लोखंडे यास डोणगाव पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Washim जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील नावली गावात ही घटना घडली. अमोल विजय लोखंडे याने 7 डिसेंबर रोजी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. आमिष दाखवून तिला पळवून नेले होते. त्यानंतर नाशिक येथे या मुलीसोबत त्याने तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले होते. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात कलम 137 (2) भा.न्या.सं. नुसार गुन्हा दाखल केला.
ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या मार्गदर्शनाच पीएसआय संदीप सावळे व पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, अल्पवयीन मुलगी व आरोपी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील शिरपूर येथे आल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुषंगाने 31 डिसेंबर रोजी पीएसआय संदीप सावळे व पथकाने आरोपी व अल्पवयीन मुलीस डोणगाव येथे आणले आणि चौकशी केली.
त्यात लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीसोबत आरोपीने वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे चौकशीत समोर आले. त्यावरून आरोपीस अटक करत त्याच्या विरोधात पोक्सो कायद्यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.