Political Diwali Milan : किराणा पोहचला अन् भैया-भाभीवर ताई गरम!

Rana vs. Thakur Dispute Reignites in Amravati : अमरावतीत राणा विरुद्ध ठाकूर वाद पुन्हा पेटला

Amravati दिवाळी म्हटलं की राणा दाम्पत्याचा “किराणा” हा विषय नेहमीच शहरात चर्चेत असतो. गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी दरवर्षी अमरावतीतील विविध झोपडपट्टी भागात राणा दाम्पत्याकडून किराण्याच्या थैल्या वाटप केल्या जातात. या उपक्रमातून त्यांना मोठी लोकप्रियता आणि राजकीय प्रसिद्धी मिळाली असली, तरी या वाटपावरून नेहमीच राजकीय वाद निर्माण होत असतात.

यंदाही अशीच चर्चा रंगली आहे. मात्र, यावेळी वादाचा केंद्रबिंदू काही वेगळाच ठरला आहे. भाऊबीजेच्या दिवशी राणा दाम्पत्याने त्यांचा ‘किराणा’ थेट काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या घरी पाठविला. या कृतीनंतर अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. ठाकूर यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत राणा दाम्पत्याला थेट इशारा दिला आहे.

Local Bode Elections : बुलढाण्यातील नगराध्यक्षपदाची निवडणूक ‘हायप्रोफाईल’!

“भैया-भाभी यांनी औकातीत राहावं, पुढे असा प्रकार पुन्हा झाला तर चांगलेच उत्तर मिळेल,” अशा कठोर शब्दांत ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या विधानानंतर ‘राणा विरुद्ध ठाकूर’ हा जुना राजकीय संघर्ष पुन्हा एकदा पेटल्याची चर्चा शहरभर सुरू झाली आहे.

अमरावतीतील मतदारसंघात राणा दाम्पत्य आणि यशोमती ठाकूर या दोघांच्या समर्थकांमध्ये नेहमीच स्पर्धा पाहायला मिळते. दोघांचं राजकीय क्षेत्र समान असल्याने एकमेकांवर टीका-प्रत्युत्तराची परंपराच सुरू आहे. राणा दाम्पत्याचा “किराणा राजकारण” हा नेहमीच त्यांच्या विरोधकांसाठी टीकेचा विषय राहिला आहे. मात्र, यंदा तो थेट ठाकूर यांच्या घरपोच पोहोचल्याने वादाला अधिक चुणचुणीत रंग चढला आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावरही दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये चांगलीच शब्दयुद्ध रंगली आहे. काहींनी राणांची कृती ‘राजकीय टोला’ म्हणून घेतली आहे, तर काहींनी ती “भाऊबीजेचा सदिच्छेचा संदेश” असल्याचं म्हटलं आहे. मात्र, ठाकूर यांच्या संतप्त प्रतिक्रियेनंतर या घडामोडीचं स्वरूप आता राजकीय संघर्षात रूपांतरित होताना दिसत आहे.

Local Body Elections : आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला!

आता पाहावं लागेल की या “किराणा वादाला” पुढे कितपत राजकीय उष्णता मिळते आणि राणा-ठाकूर यांच्यातील हा संवादयुद्ध आणखी किती रंगतंय. अमरावतीचं राजकारण मात्र सध्या या चर्चेभोवतीच फिरताना दिसत आहे.