Vanchit Bahujan Aghadi Leader Strongly Criticizes the Government : शेतकऱ्यांसाठी मदत मंजूर, पण आदेश नाही; सरकारवर तीव्र टीका
Akola “शासनाने शेतकऱ्यांसाठी मदत मंजूर केली, पण ती वितरित करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिलाच नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांची वाहने फोडण्यात अर्थ नाही; वाहने फोडायची असतील तर सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांची फोडा,” असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी बार्शिटाकळीत झालेल्या जाहीर सभेत केला.
ॲड. आंबेडकर म्हणाले, “भाजप सरकार केंद्राचे असो वा राज्याचे — दोन्ही ठिकाणी ते पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आधी ३१ हजार कोटी आणि नंतर वाढीव ११ हजार कोटी, असे एकूण ४२ हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज मंजूर केले. पण प्रत्यक्षात वितरित करण्याचे आदेश आजतागायत दिले गेलेले नाहीत. त्यामुळे मदत केवळ कागदावरच आहे.”
Mumbai shook : चित्रपटात कामाचं आमिष दाखवून 17 चिमुकल्यांना डांबून ठेवलं !
कार्यक्रमाला ॲड. खतीब, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ, प्रतिभा सिरसाट, बळीराम चिकटे, आयोजक अशोक कोहर, मंदा देशमुख, तालुका कार्याध्यक्ष गोरसिंग राठोड, ॲड. आशिष देशमुख, ॲड. गोपाल देशमुख, गोपाल चव्हाण, सतीष पवार, आशा ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
Satyacha morcha : मतचोरीविरोधात मनसे सह महाविकास आघाडीचा ‘सत्याचा मोर्चा’
सभा दरम्यान ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही तीव्र टीका केली. ते म्हणाले, “पाकिस्तानसोबतच्या युद्धकाळात एकही देश भारताच्या बाजूने उभा राहिला नाही. परंतु माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी बांगलादेश वेगळा करून दाखवला, कारण त्यांच्यात ‘जिगर’ होता. आजच्या पंतप्रधानांमध्ये तो जिगर नाही.”
 
             
		
