Breaking

Pramod Manmode : उद्धवसेनेच्या कार्यालयाकडे जिल्हाप्रमुखाचीच पाठ !

 

The district chief avoid to come at party office : ठाकरेंच्या शिवसेनेचे नागपुरातील अस्तित्व धोक्यात?

Nagpur महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा दावा उद्धवसेनेकडून करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचेच संघटनेकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. रेशीमबाग येथील पक्षाच्या कार्यालयात केवळ काही पदाधिकारीच नियमितपणे जातात. जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे यांनी तर त्याकडे पाठच फिरविल्याचे चित्र आहे.

२०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. पक्षाच्या विभाजनानंतर रामटेकचे तत्कालीन खासदार कृपाल तुमाने आणि रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले. सद्य:स्थितीत तुमाने हे विधानपरिषद सदस्य आहेत तर जयस्वाल हे महायुती सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत.

Indian Railway Ministry : जनतेनेच घेतला फॉलो-अप; रेल्वेची ऐतिहासिक कामगिरी!

दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत रामटेकमध्ये उद्धवसेनेला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभा निवडणुकीत पक्षाने नागपूर शहरातील एकही जागा लढविली नाही. पक्षाचे विभाजन होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच शिवसेनेचे गणेशपेठेतील कार्यालय बंद पडले.

रेशीमबाग येथील कार्यालय पक्षाच्याच मालकीचे आहे. सध्या येथे फक्त जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया व त्यांचे कार्यकर्ते बसतात. दुसरे जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे व शहरप्रमुख दीपक कापसे, नितीन तिवारी येथे फिरकत नाहीत. प्रमोद मानमोडे यांनी गणेशपेठ कार्यालयाची गरज नसल्यामुळे ते बंद केले असल्याचे सांगितले.

Washim Police : १.१५ काेटींची लुटमार, फिर्यादीच झाला आराेपी!

आपल्या वैयक्तिक कार्यालयातून पक्षाचे काम सुरू आहे. अशा स्थितीत स्वतंत्र कार्यालयाची गरज नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र त्यांच्या या भूमिकेमुळे कार्यकर्ते उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत.शहरात स्वबळावर आपण पाच-सहा तरी जागा जिंकू शकतो का, सर्व जागांवर लढण्यासाठी उमेदवार तरी मिळतील का, अशी शंका उपस्थित करीत पक्षाची खरी स्थिती पाहून तरी नेत्यांनी काम करावे, असे कार्यकर्त बोलत आहेत.