Huge crowd on Shiv Jayanti in Buldhana : शिवजयंतीचे लोकोत्सवात रुपांतर
Buldhana उज्जैनहून आलेल्या डमरू-झांज पथकाच्या गजराने, विविध ढोल पथकांच्या गजराने आणि भव्य मिरवणुकीतील शिव-हनुमानाच्या आकर्षक मूर्तींनी संपूर्ण बुलढाणा शहर शिवमय झाले. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारे रथ, ढोल-ताशांच्या गजराने शहरात शिवसागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.
बुलढाणा येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती समितीच्या वतीने जिजामाता प्रेक्षागाराजवळील ‘शिवनेरी’ येथे शिवजयंती उत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी आमदार संजय गायकवाड होते. तसेच जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, विजयराज शिंदे, योगेंद्र गोडे, जालिंदर बुधवत, चंद्रकांत बर्दे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Congress leader on Sahasram Korote : काँग्रेसशी गद्दारी करणारे भटकतच राहणार
छत्रपती शिवाजी महाराज यांनी खर्या अर्थाने दिल्लीचे तख्त काबीज केले. त्यांच्या कार्याची महती आजही देश-विदेशात शिवजयंती साजरी होत असल्याने अधोरेखित होते. विशेषतः बुलढाणा शहरातील शिवजयंती महाराष्ट्रासाठी दिशादर्शक असून, हा उत्सव आता लोकोत्सव बनला आहे, असे प्रतापराव जाधव म्हणाले.
माजी सैनिकांच्या दोन्ही रेजिमेंटने महाराजांना मानवंदना दिली. राजीव गांधी मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी आणि स्काऊट-गाईड पथकांनीही महाराजांना अभिवादन केले. सकाळी शहरातून महापुरुषांच्या स्मारकांना अभिवादन करणारी भव्य रॅली काढण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल वानखेडे व गायत्री सावजी यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमांनी या सोहळ्याला अधिक रंगत आणली.
fake birth certificate case : जन्मदाखल्याच्या प्रकरणात मनसेचा गंभीर आरोप
बुलढाणा सार्वजनिक शिवजयंती समितीने मागील वर्षी आणि यावर्षीही भव्य प्रमाणात शिवजयंती साजरी केली. त्यामुळे हा सोहळा विश्वविक्रमी असल्याचे मत आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केले. या वर्षीची शिवजयंती केवळ सार्वजनिकच नाही, तर सर्वसमावेशक ठरली, असे समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे यांनी सांगितले. शहरातील शिवप्रेमींच्या सहकार्याने कमी कालावधीत हा सोहळा भव्य स्वरूपात पार पडल्याचे त्यांनी नमूद केले.