Five Sarpanchs and 165 members posts are vacant : पाच सरपंच आणि १६५ सदस्यांची पदे रिक्त
Amravati Elections जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना मुदतवाढीचा विषय तर संपला आहे. आता प्रशासकांच्या हाती कारभार गेला आहे. निवडणुका कधी होतील, हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे तयारी कशी करावी आणि कधी करावी, याबाबतही राजकीय पक्षांमध्ये संभ्रम आहे. अशा परिस्थितीत अमरावती जिल्ह्यात पाच सरपंच आणि १६५ ग्रामपंचायत सदस्यांसाठी पोटनिवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.
जिल्ह्यात डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत पाच थेट सरपंच आणि सदस्यांची १६५ पदे रिक्त आहेत. असा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे या रिक्त पदांसाठी लवकरच पोटनिवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वी संबंधित कार्यक्षेत्रात मतदार याद्यांचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.
Amravati Police claims of NO Pendency : पोलिसांकडे तक्रारींची ‘नो पेंडन्सी’?
राज्य निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना रिक्त पदांचा तपशील मागविला होता. त्यानुसार, ११४ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचांची पाच पदे रिक्त आहेत, तर सदस्यांची १६५ पदे भरण्यासाठी निवडणूक लागणार आहे. सदस्यांच्या रिक्त पदांमध्ये अनुसूचित जाती (एससी)ची ३३ पदे, अनुसूचित जमाती (एसटी)ची ७९ पदे, नामनिर्देशित (नामाप्र) ९ पदे, सर्वसाधारण प्रवर्गातील ४४ पदे आहेत.
तर थेट सरपंचपदांपैकी अनुसूचित जमातीसाठी १, नामाप्रसाठी १ आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी १ सरपंच पद रिक्त आहे. आयोगाद्वारे लवकरच मतदार याद्या सुधारित करण्याचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यानंतर पोटनिवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू होईल.
तालुकानिहाय रिक्त पदांचा तपशील:
अमरावती जिल्ह्यात विविध तालुक्यांतील रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहे: अमरावती तालुका: १, भातकुली: १२, नांदगाव: ११, चांदूर रेल्वे: ९, धामणगाव: ६, तिवसा: ८, मोर्शी: १४, वरुड: १३, चांदूरबाजार: १०, अचलपूर: १८, अंजनगाव सुर्जी: ९, दर्यापूर: १८, चिखलदरा: १४, धारणी: २७.