Breaking

Radhakrushna Vikhe-Patil : सत्ता नाही म्हणून कुणी प्रदेशाध्यक्ष व्हायला तयार नव्हते!

No one was ready to become the state president in Powerless Congress : विखे पाटलांचा काँग्रेसला चिमटा; सपकाळांच्या नियुक्तीनंतर बोलले

Nagpur काँग्रेसच्या प्रदेशाध्यपक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव जाहीर झाले असले तरी पक्षातील कुरबुरी संपलेल्या नाहीत. या स्थितीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला चिमटा काढला आहे. काँग्रेसची सत्ता नाही म्हणून कुणी प्रदेशाध्यक्ष व्हायला तयार नव्हते, असं ते म्हणाले आहेत.

काँग्रेसची सत्ता होती म्हणून लोक टिकून होते. आता सत्ता नाही व येण्याची शक्यता नाही. एवढा निच्चांक काँग्रेसने कधीच गाठला नव्हता. त्यामुळे आता प्रत्येकजण दुसरीकडे बोट दाखवत आहे. प्रदेशाध्यक्षपद कुणी घ्यायला तयार नाही. सत्ता नाही म्हणून प्रदेशाध्यपदाची संधी नाकारणाऱ्या दिग्गजांचे पक्षश्रेष्ठीसमोर पितळ उघडे पडत आहे. अशी टीका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

CM Devendra Fadnavis : जलयुक्त शिवारमुळे महाराष्ट्र जलक्रांतीच्या दिशेने!

हर्षवर्धन सपकाळ हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांना संधी मिळाली ही चांगली गोष्ट आहे. मात्र दिग्गज नेत्यांना डावलून संधी दिली, हे म्हणणे योग्य नाही. कारण दिग्गजच मैदानातून पळून गेले आहेत. महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून त्यांची बिघाडी सुरु होती. ते राज्याच्या किंवा समाजाच्या हितासाठी नव्हे तर सत्तेसाठी एकत्र आले होते, असेही विखे पाटील म्हणाले.

Manikrao Kokate : आता प्रत्येक विभागात ‘कृषी मंत्री कक्ष’!

यावेळी विखे पाटील यांनी लाडकी बहीण योजनेबाबतदेखील भाष्य केले. या योजनेसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या मतावर भाष्य करणे उचित नाही. राज्यात सुरू असलेल्या कल्याणकारी योजना या जनतेच्या हितासाठी सुरू केल्या आहेत. शेतामध्ये मजूर मिळत नाही, अशा कारणांसाठी योजना बंद करण्याची गरज नाही. वेगळा पर्याय असू शकतो. यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.