Rain alert : सावधान! महाराष्ट्रारात मुसळधार पावसाचा इशारा

Major warning from Indian Meteorological Department for 24 hours : भारतीय हवामान विभागाकडून 24 तासांसाठी मोठा इशारा

Mumbai : भारतीय हवामान विभागाकडून पुढील 24 तासांसाठी मोठा इशारा जारी करण्यात आला आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून सतत पावसाची रिपरिप सुरू असून आज देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा अनुभव येत आहे. पंजाब, दिल्ली, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रात कोकण, उत्तर महाराष्ट्र व घाटमाथा भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

Local Body Elections : प्रभाग रचनेच्या हरकतींवरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने!

काल रात्री मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस झाला. ठाणे, रायगड, पालघर, नंदुरबार, नाशिक आणि पुण्यातील घाटमाथा भागात आजही मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, सततच्या पावसामुळे राज्यातील अनेक धरणे भरून वाहण्याच्या तयारीत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी गिरणा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून यामुळे पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाचा आणि औद्योगिक वसाहतींचा वर्षभराचा प्रश्न मिटला आहे. नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील 175 गावांना या धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने गिरणा धरणाचा एक दरवाजा 20 सेंटीमीटरने उघडण्यात आला आहे. सध्या गिरणा धरणातून 814 क्यूसेक्स व मन्याड धरणातून 417 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गिरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याचा विसर्ग परिस्थितीनुसार कमी-जास्त केला जाऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

Maratha reservation : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये!

सततच्या पावसामुळे अनेक धरणांमधील जलसाठा 96 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेला असून पुढील काही दिवसांत पाण्याचा विसर्ग वाढू शकतो. त्यामुळे नद्यालगतच्या गावांनी विशेष सावधानता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.