Raut said Uddhav had only gone to meet his aunt. : राऊत म्हणाले उद्धव फक्त मावशींना भेटायला गेले होते
Mumbai : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील भेटीने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची तब्बल पावणे तीन तास भेट घेतल्याची माहिती आहे. मात्र, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला.
“उद्धव ठाकरे हे फक्त राज ठाकरे यांच्या आई कुंदा मावशींना भेटायला गेले होते. गणपतीच्या वेळी गर्दीमुळे जास्त संवाद झाला नव्हता, त्यामुळे हा केवळ कौटुंबिक दौरा होता,” असे राऊतांनी स्पष्ट केले. गेल्या काही महिन्यांत राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये सलग तिसरी भेट झाली आहे. याआधी मराठीच्या मुद्द्यावर दोघे एकाच मंचावर आले, त्यानंतर वाढदिवसानिमित्त भेट झाली आणि गणपती दर्शनाच्यावेळीही दोघे आमनेसामने आले होते. त्यामुळे या भेटीचा राजकीय अर्थ लावला जात असला तरी ठाकरे गट त्याला फेटाळत आहे.
दरम्यान, यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरील मैदान उद्धव ठाकरे यांच्या सेनेला देण्यात आलं आहे. मागील काही वर्षांपासून शिंदे गट आणि ठाकरे गटात या ठिकाणासाठी रस्सीखेच होत होती. मात्र, यंदा शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे.
_____