Raja Raghuvanshi Murder : हनिमूनला गेल्यावर नववधूनेच रचला नवऱ्याच्या हत्येचा कट!

The bride plotted to kill her husband on honeymoon : प्रियकरासोबत आधीच आखली नवऱ्याच्या हत्याकांडाची योजना

Indore : हनिमूनला गेलेल्या इंदूरच्या नवदाम्पत्याचा विषय गेल्या काही दिवसांपासून खूपच गाजत आहे. यात नवऱ्याचा मृतदेह सापडल्यावर पत्नीचे अपहरण झाल्याची शंका व्यक्त होत होती. मात्र नववधूनेच पतीची क्रूर हत्या घडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रियकरासोबत आधीच तिने नवऱ्याच्या हत्याकांडाची योजना आखल्याचेही समोर आले आहे.

इंदूरचे नवविवाहित जोडपं राजा रघुवंशीची आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी हनिमून साठी मेघालयात गेले होते. ते तिकडे बेपत्ता झाले असे वृत्त धडकले आणि या प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू झाली. यातील पती राजाची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले. त्याचा मृतदेह 2000 फूट खोल दरीत सापडला. मृतदेहाच्या बाजूला एक पांढरा शर्ट होता. तर पत्नी गायब होती. तिचा शोध लागत नव्हता. आता या प्रकरणात खळबळ जनक खुलासा झाला आहे.

Ravikant Tupkar : शेतकऱ्यांचा १० जूनला शेगावांत एल्गार!

मात्र सोनम उत्तर प्रदेशच्या गाजीपूर येथील नंदगंजमध्ये एका ढाब्याजवळ सापडली. तिला ताब्यात घेण्यात आले. तेव्हा सोनमनेच ही हत्या घडवून आणली हे स्पष्ट झाले. या प्रकरणात दोन आरोपींना इंदूरमधून अटक करण्यात आली आहे. एक आरोपी उत्तर प्रदेशचा राहणारा असून तो फरार आहे. या प्रकरणात सगळच संशयास्पद होतं. त्यामुळे मध्य प्रदेश सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. आता पत्नी सोनमच या भयानक हत्याकांडामागे असल्याच स्पष्ट झाले.

सोनम रविवारी 3 ते 4 दरम्यान गाजीपूर नंदगंज येथे एका ढाब्याजवळ पोहोचली. ढाबे वाल्याच्या फोनवरुन भाऊ गोविंद रघुवंशीला व्हिडिओ कॉल केला. त्याला गाजीपूर येथे असल्याचे सांगितले, गोविंदने तात्काळ इंदूर पोलिसांना ही बाब कळवली. त्यांनी गाजीपूर पोलिसांशी संपर्क साधला. ढाबेवाल्याने सुद्धा इमर्जन्सी नंबर 112 वर कॉल केला. घटनास्थळी पोलीस पोहोचले. त्यांनी सोनमला ताब्यात घेतले.

पोलीस तपासात समोर आले की, लग्नाआधी सोनमचे राज कुशवाह नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळेच तिने राजा रघुवंशीच्या हत्येची योजना आखली. मेघालयच्या शिलॉन्ग येथे 20 मे रोजी दोघे हनिमूनसाठी गेले होते. राजा आणि सोनम 23 मे रोजी नोंग्रियाट गावातील एका गावात होम स्टेसाठी थांबले. तिथून चेकआऊट केल्यानंतर दोघे बेपत्ता झाले. 24 मे रोजी त्यांची स्कूटी सोहरिम येथे बेवारस स्थितीत सापडली. 2 जून रोजी वेईसावडॉन्ग तळ्याजवळ एका खोल दरीत राजाचा मृतदेह सापडला. त्यावेळी राजाची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.

Local Body Elections : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जुनाच फाॅर्म्युला

या प्रकरणात मेघालय पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. आतापर्यंत तीन आरोपींना इंदूर येथून अटक करण्यात आली आहे. एका फरार आरोपीचा शोध सुरु आहे. सोनमला गाजीपूर येथून ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होतील. कुटुंब आणि रघुवंशी समाज सोनमची सुरक्षित घरवापसी आणि सीबीआय चौकशीची मागणी करत होते. या नव्या खुलाशाने सगळेच स्तब्ध झाले आहेत.