Raju Shetty : मित्रपक्षांच्या पालकमंत्र्यांवर भाजपचा ‘वॉच’?

BJP’s ‘watch’ on guardian ministers of ally parties? : राजू शेट्टींची टीका, सहपालकमंत्र्यांच्या नियुक्तीमागे राजकीय खेळ असल्याचा आरोप

Chikhali राज्यात सहपालकमंत्री नियुक्तीमागे राजकीय खेळी असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. त्यांनी म्हटले की, “सहपालकमंत्री पद हे मित्रपक्षांच्या पालकमंत्र्यांवर आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी आहे.”

चिखली दौऱ्यावर आलेल्या शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला. त्यांनी स्पष्ट केले की, “आपापल्या पक्षातील मंत्र्यांना खूश करण्यासाठी ही पद्धत राबवली जात आहे. सहपालकमंत्र्यांची निवड म्हणजे भाजपकडून मित्रपक्षांच्या मंत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याची युक्ती आहे.”

Raju Shetty : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या

त्यांनी सवाल केला की, “ज्या जिल्ह्यात भाजपचे पालकमंत्री आहेत, तिथे सहपालकमंत्री नाहीत, मग याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे.” यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीदेखील हा प्रश्न फडणवीस यांना विचारावा, असा टोलाही शेट्टींनी लगावला.  जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री मकरंद जाधव यांना आता राज्य सरकारकडून सहकारी मिळाला आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश राज्य शासनाने मंगळवारी काढला.

Bacchu Kadu : बच्चू कडू आता राज्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेणार

या नियुक्तीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. “पालकमंत्री यशस्वीपणे जबाबदारी सांभाळत असताना अचानक दुसरे सहपालकमंत्री का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काहीजण यामागे भाजपकडून मित्रपक्षाच्या मंत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याची रणनीती असल्याचे सांगत आहेत.