A conspiracy to end the Republican Party in the country: रामदास आठवलेंचा खळबळजनक दावा
Nagpur नामांतरवीर उपेंद्र शेंडे यांना आदरांजली अर्पण करत असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी खळबळजनक दावा केला. देशात रिपब्लिकन पक्ष संपविण्याचे षडयंत्र सुरू आहे, परंतु आम्ही हातात निळा झेंडा घेऊन विचार सोडलेला नाही, असे ते म्हणाले.
Investigative System : Forensic Odontology मुळे कायदेशीर तपासाला वेग
आता नेमक्या कोणत्या शक्ती रिपब्लिकन पक्ष संपविण्यासाठी सरसावल्या आहेत? हे आठवले कधी स्पष्ट करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सर्वपक्षीय श्रद्धांजली संयोजन समितीतर्फे कामठी मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरमध्ये नामांतरवीर उपेंद्र शेंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत ताराचंद्र खांडेकर होते. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, लाँगमार्चचे प्रणेते प्रा. जोगेन्द्र कवाडे, माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे सचिव डॉ. राजेन्द्र गवई, माजी आमदार डॉ. मिलींद माने, खोरिपाचे राष्ट्रीय सरचिटणीस उत्तम गवई, राष्ट्रीय प्रवक्ते प्रा. डॉ. एन. व्ही. ढोक, माजी कुलसचिव डॉ. पुरण मेश्राम, माजी आमदार प्रकाश गजभिये, महेंद्र मानकर, कवी डॉ. विठ्ठल शिंदे उपस्थित होते.
रिपब्लिकन ऐक्य होत नसल्यामुळे आपण भाजपसोबत गेलो. बाळासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व करून ऐक्याची भूमिका घेण्याचे आवाहन आठवले यांनी केले.
Four and a half thousand women got help : Dial 112 मुळे वाचले ८०० लोकांचे प्राण !
यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शेंडे यांच्या स्मृतींना उजाळा देत रिपब्लिकन चळवळीतील मतभेदांवर बोट ठेवले. भ्रष्टाचारापासून चार हात दूर राहून साधे राहणीमान ठेवत शेंडे यांनी निळ्या झेंड्याशी अखेरपर्यंत प्रामाणिकपणा केला, परंतु त्यांना हवे असलेले रिपब्लिकन ऐक्य होऊ शकले नाही, ही दुर्भाग्याची गोष्ट असल्याची खंत गडकरींनी व्यक्त केली.
उपेंद्र शेंडे यांनी गोरगरीब जनतेसाठी कार्य केले. त्यांना मी उत्तर नागपुरातून भाजपच्या तिकिटावर लढण्याची ऑफर दिली होती, परंतु त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या विचारांशी तडजोड केली नाही. गरिबांच्या समस्या घेऊन ते अनेकदा मला भेटले, परंतु त्यांनी कधीच वैयक्तिक काम मला सांगितले नाही, असे गडकरी म्हणाले.