Pay 10 percent commission to brokers, only then will get the money shopkeepers deserve : विभागातील दलालांची लवकरात लवकर बदली करा
Nagpur : राज्यात रेशन दुकानदारांची अक्षरशः पिळवणूक सुरू आहे. उपराजधानीत दलाल बनलेल्या अधिकाऱ्यांनी दुकानदारांना हैराण करून सोडले आहे. रेशन दुकानदारांनी केलेल्या तक्रारींनंतर सुनावणी घेण्यात आली. ही पण त्या अधिकाऱ्यांचीच ‘सेटींग’ आहे. त्यामुळे सुनावणीसुद्धा रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष उमाशंकर ऊर्फ गुड्डू अग्रवाल यांनी केली आहे. येत्या दोन दिवसांत या दलालांचे सत्य महाराष्ट्रासमोर उघड करण्याचा इशाहारी अग्रवाल यांनी दिला आहे.
अन्न व नागरी पुरवठा आणि संरक्षण विभागाच्या मंत्र्यांच्या नावावर दलाल आणि अधिकारी संगनमत करून वसुली करत असल्याचाही आरोप गुड्डू अग्रवाल यांनी केला आहे. नागपुरात FDO आणि DSO (जिल्हा पुरवठा अधिकारी) यांनी गेल्या सात महिन्यांपासून रेशन दुकानदारांना त्यांच्या हक्काचे कमिशन मिळू दिले नाही. हे दोन्ही अधिकारीच दलाली करत आहेत. त्यामुळे शासनाने या दोन्ही दलालांची तात्काळ बदली करावी, असेही अग्रवाल यांनी म्हटले आहे. या लोकांना १० टक्के कमिशन दिले तरच रेशन दुकानदारांना त्यांच्या हक्काचे कमिशन मिळू शकते, अशी परिस्थिती या अधिकाऱ्यांना आणल्याचे अग्रवाल यांनी ‘सत्तावेध’ ला सांगितले.
Rain alert : राज्यात मुसळधार पावसाचा तांडव, 21 जणांचा मृत्यू !
कित्येक वर्षे मागणी केल्यानंतर शासनाने रेशन दुकानदारांना कमिशन वाढवून दिले. त्यासाठी रेशन दुकानदारांनी मोठा लढा दिला. आता दुकानदारांच्या कमिशनवर दलाल बनलेल्या अधिकाऱ्यांचा डोळा आहे. अशा लोकांवर शासनाने कठोर कारवाई करावी. अन्यथा रेशन दुकानदारांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल. ही परिस्थिती टाळायची असेल तर शासनाने तात्काळ कारवाई करावी, असे गुड्डू अग्रवाल यांनी म्हटले आहे.