Breaking

Ravi Rana : नवनीत राणांच्या हत्येच्या कटात ८ ते १० जणांचा सहभाग

Claim that 8 to 10 people were involved in the conspiracy to murder Navneet Rana : आमदार रवी राणा यांचा दावा, मुख्य आरोपीला मध्य प्रदेशातून अटक

Amravati पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे बोलतात ते करण्याची धमक ठेवतात. या धमकेमुळेच शरद पवार यांनी आज जसे वक्तव्य केले तसे पुन्हा करणार नाहीत. आगामी काळात शरद पवार पंतप्रधान मोदींना साथ देतील आणि त्यांचे नेतृत्व मान्य करतील, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला.

माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी नवे धक्कादायक तपशील समोर आले असून, यात आठ ते दहा मुस्लिम तरुणांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप आमदार राणा यांनी केला आहे. “हत्येचा कट रचला गेला आणि बैठका झाल्या” असेही ते म्हणाले.

Shiva Iyer : पुढील पंतप्रधान मराठी माणूसच हवा, शिवा अय्यर यांचा आग्रह

अमरावती पोलिसांच्या शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्य आरोपी ‘इसा’ला मध्य प्रदेशातून अटक केली. त्याच्यासह आणखी आठ ते दहा तरुण या कटात सहभागी असल्याची माहिती आमदार राणा यांनी दिली. या आरोपींनी नवनीत राणा यांच्यावर गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत “सर तन से जुदा” अशी धमकी दिल्याचे ते म्हणाले.

आमदार राणा यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात काही मुस्लिम तरुणांचा सहभाग असला तरी संपूर्ण समाजाला दोष देत नाही. मात्र अशा प्रवृत्तींना समाजाने आवर घालावा, अन्यथा “पुढच्या वेळी कायदा-सुव्यवस्था बाजूला राहील आणि आम्ही घरात घुसून मारू” असा इशारा त्यांनी दिला. कोणत्याही महिलेबद्दल अश्लील भाषा वापरणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असेही ते म्हणाले. युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते अशा विकृतींना थारा देणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Sanjay Khodake : प्रशासनाने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे

दरम्यान, युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधन उत्सव साजरा झाला. अनेक महिलांनी आमदार राणा यांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या. “बहिणींसाठी मिळणारा लाभाचा निधी दुप्पट केल्यास त्यांच्या आशीर्वादाचा फायदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना होईल,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.