Breaking

Ravikant Tupkar : शेतकऱ्यांचा १० जूनला शेगावांत एल्गार!

Farmers agitation in Shegaon for loan waiver : कर्जमाफी आणि पिकविमा हक्कासाठी मेळावा

Buldhana राज्य सरकारच्या कृषी धोरणाविरोधात पुन्हा एकदा क्रांतिकारी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. शेगावमध्ये १० जून रोजी “कर्जमाफी व पिकविमा हक्कासाठी” एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हा मेळावा होणार आहे.

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावात सकाळी ११ वाजता अग्रसेन चौकातील माहेश्वरी भवन येथे हा मेळावा होणार आहे. यापूर्वी सिंदखेडराजा येथे मेळावा झाला होता. आता संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन संतनगरीत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी एल्गार पुकारणार आहेत.

Nilesh vs Nitesh Rane: राणे बंधूमध्ये शाब्दिक रण, ‘तुम्ही टॅक्स फ्री आहात’ म्हणताच ‘ती’ पोस्ट केली ‘डिलीट’

संपूर्ण कर्जमाफी, उशिरा मिळणारा किंवा अजूनही न मिळालेला पिकविमा तत्काळ खात्यावर जमा करणे, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांना नुकसानभरपाई, सक्तीची कर्जवसुली थांबवणे, जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण, सोयाबीनला ₹८ ते ₹१० हजार आणि कापसाला ₹१२ ते ₹१४ हजार हमीभाव, या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत.

राज्यभरातील शेतकऱ्यांना एकत्र करून सरकारवर दबाव टाकण्याचे नियोजन सुरू आहे. याअंतर्गत नाशिक, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बीडसह अनेक जिल्ह्यांमध्ये दौरे करून तुपकर यांनी शेतकरी मेळावे घेतले आहेत.

Split in Shinde Sena : दोन दिवसांत दुसरी बैठक, शिंदे गट अस्वस्थ

राज्य सरकारच्या कृषी धोरणांविरोधात शेतकऱ्यांचा हा एल्गार राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून याचे आयोजन होत असल्याचेही बोलले जात आहे.