Ravikant Tupkar : तुपकरांची आता ‘किसान आर्मी’, सरकारला इशारा

Formation of ‘Kisan Army’ will challenge the government : फक्त आंदोलन नाही, सरकारला जागे करण्याची वेळ

Sindkhedraja शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आता ‘किसान आर्मी’ची घोषणा केली आहे. नव्या संघटनेची घोषणा करताच त्यांनी राज्य सरकारला थेट आव्हानही दिले आहे. सिंदखेडराजा येथे झालेल्या शेतकरी एल्गार मेळाव्यात तुपकर यांनी “आता केवळ आंदोलन नाही, तर संघटित शक्तीने सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे,” असा स्पष्ट इशारा दिला.

सिंदखेडराजा येथील सावता भवनात आयोजित शेतकरी एल्गार मेळाव्याला जिल्हाभरातून शेतकरी व महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. तुपकर यांनी आपल्या भाषणात सरकारच्या अनेक धोरणांवर थेट प्रहार करत “सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवत बसायचं नाही, आता ‘किसान आर्मी’चं बुट टेकवायचं वेळ आली आहे”, अशा शब्दांत सरकारला जाब विचारला.

Eknath Shinde Shiv Sena : समस्या सोडवल्या नाही तर उलटं टांगण्यात येईल, शिवसेनेचा इशारा

“शेतकऱ्यांसाठी आमचा संघर्ष सरकारला अस्वस्थ करणारा ठरेल,” असा इशारा तुपकरांनी दिला आहे. “निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचं गाजर दाखवण्यात आलं. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती काहीच आलं नाही. आता फसव्या घोषणांवर शेतकरी विश्वास ठेवणार नाही,” असा हल्ला त्यांनी केला.

Project-affected people in Vidarbha : विदर्भातील प्रकल्पबाधितांच्या पदरी निराशा; अनुदान मंजूर, मात्र निधीचा पत्ता नाही!

तुपकर यांनी पीक विमा योजनेतील अपयशावरून सरकार आणि विमा कंपन्यांना लक्ष करत “आता थेट अधिकाऱ्यांना उत्तरदायित्वासमोर उभं केलं जाईल. गरज भासल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाईल,” असे ठणकावले.