RBIs gift big cut in repo rate : आरबीआयचे मोठे गिफ्ट, रेपो दरात पुन्हा मोठी कपात
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे ग्राहकांना रेपो दरात कपात करत मोठे गिफ्ट दिले आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे कोट्यवधी भारतीयांना दिलासा मिळणार आहे. रेपो दरात कपातीची घोषणा केल्यामुळे कार, घराचा ईएमआय थोडा कमी होणार आहे.
शुक्रवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी धोरणात्मक व्याजदर कपातीची घोषणा केली आहे. MPC मॉनेटरी पॉलिसी म्हणजे चलनविषयक धोरण समिती सदस्यांनी रेपो दरात 50 बेसिस पॉइंट कपातीच्या बाजूने मतदान केले. आता ते ६ टक्क्यांवरून ५.५ टक्क्यांवर आले आहे. 2025 मध्ये सलग तिसऱ्या बैठकीत व्याजदरात कपातीची घोषणा करण्यात आली आहे.
Revenue Department : ‘तिसरा डोळा’ पकडणार अवैध गौण खनिज उत्खणन !
मध्यवर्ती बँकेच्या या निर्णयामुळे तुमच्या कर्जाचा हप्ता कमी करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. मात्र बँकांनी व्याजदर कपातीची घोषणा केल्यानंतरच हे शक्य होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर म्हणजे रेपो दर . जेव्हा रेपो दर कमी होतो, तेव्हा बँकांना कर्ज घेणे स्वस्त होते आणि ते त्यांच्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देऊ शकतात.
आता असे गृहीत धरू की तुमच्याकडे गृहकर्ज आहे ज्याचा व्याजदर रेपो दराशी जोडलेला आहे. रेपो रेट 6% वरून 5.5% पर्यंत घसरल्यास, तुमच्या गृहकर्जाचा व्याजदर देखील कमी होऊ शकतो. कसे ते जाणून घेऊया.
समजा तुमचे गृहकर्ज 20 वर्षांच्या म्हणजे 240 महिन्याच्या कालावधीसाठी आहे. समजा यावर आठ टक्के व्याजदर असेल तर महिन्याला सुमारे 16 हजार 729 रुपये आत्ता पडतो. नवीन व्याजदराने ही गणना 7.5% ने होईल अशावेळी हा हप्ता 16,138 रुपये होतो म्हणजे रेपो रेटमध्ये कपात झाल्यामुळे साधारण 591 रुपयांनी हप्ता कमी होऊ शकतो. हे एक प्रातिनिधीक उदाहरण आहे प्रत्येकाच्या कर्जाची रक्कम संबंधित बँकेचे व्याजदर आणि किती काळाकरता कर्ज घेतले आहे यावर हे आकडे त्या पद्धतीने बदलू शकतात.
#RBIRepoRate #RBIgiftbigcutinreporate #rbi #MPC #GovernorSanjayMalhotra #rbigovernor #रेपो रेट #आरबीआय #रिझर्व्ह बँक #चलनविषयकधोरणसमिती #गव्हर्नर संजय मल्होत्रा