Controversy over glorification of Aurangzeb and Ibrahim Ghazi : मिरवणुकीत महिमामंडन; तिघे अटकेत, दहा आरोपींचा शोध
Akola ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीत औरंगजेब व इब्राहिम गाझी यांचे महिमामंडन करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. टिळक रोडवरील कापड बाजार चौकात मिरवणुकीदरम्यान काही युवकांनी औरंगजेब व इब्राहिम गाझी यांच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक व जलाभिषेक केला. या प्रकाराचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिघांना अटक केली, तर अज्ञात आठ ते दहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सै. शारीक सै. जमीर (२७, रा. जमजम पार्क, गंगानगर), शे. आसिफ शे. अल्ताफ (२७, रा. हमजा प्लॉट) आणि मोहीन खान मतीन खान (२७, रा. गंगानगर) या तिघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. “या कृत्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या असून सामाजिक ऐक्य बिघडविण्याचा प्रयत्न झाला आहे. व्हायरल व्हिडीओवरून ८ ते १० जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे,” अशी माहिती सिटी कोतवाली पोलिस ठाण्याचे ठाणेदार संजय गवई यांनी दिली.
Jayant Patil : राष्ट्रवादीच्या शिबिरात जयंत पाटलांच्या नाराजीची चर्चा
या प्रकारामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे. आरोपींनी हेतुपुरस्सर धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, कठोर कारवाईची मागणी होत आहे.
दरम्यान, हरिहर पेठ, शीतला माता मंदिर चौक आदी भागांतही औरंगजेबाचे पोस्टर लावण्यात आल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.