Reservation controversy : मराठ्यांना ओबीसी आरक्षण दिल्यास लाखोंचा ….

Chhagan Bhujbals direct warning to the government : छगन भुजबळ यांचा सरकारला थेटच इशारा

Mumbai : राज्यातील आरक्षणाच्या राजकारणात आज मोठा टप्पा गाठला गेला. ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे.मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, अन्यथा लाखोंच्या संख्येने मुंबईत धडकू, असे भुजबळ म्हणाले. त्यांनी स्पष्ट केले की, “कुणबी समाज कुणबीच आहे, आम्हाला यावर आक्षेप नाही. पण मराठा समाजाला ओबीसीत सामावून घेणे म्हणजे कायदा आणि संविधान बाजूला ठेवणे होईल.”

भुजबळ म्हणाले की, “आम्ही जिल्ह्याजिल्ह्यातून, तालुक्याटालुक्यातून मिरवणुका काढू, उपोषण करू. आमच्यावर अन्याय झाला तर लाखोंचा लोंढा मुंबई गाठेल.”

Pankaj Bhoyar : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, गृहराज्यमंत्र्यांची घोषणा !

त्यांनी ब्राह्मण समाजाचा संदर्भ देत सवाल केला की, “आज ब्राह्मणांकडेही शेती आहे, मग त्यांना कुणबी म्हणायचं का? उद्या कोणी म्हणेल मला दलित समाजात घ्या, तर काय कायदा व संविधान बदलले जाणार? पत्रकार परिषदेत भुजबळ यांनी आंदोलनादरम्यान महिला पत्रकार व खासदार सुप्रिया सुळे यांना झालेल्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली. “आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण ते शांततेने आणि लोकशाही मार्गाने व्हायला हवे,” असे मत त्यांनी नोंदवले.

Pankaj Bhoyar : जरांगेंच्या मागे कोणती अदृश्य शक्ती, हे फडणवीस योग्य वेळी सांगतील !

भुजबळ यांनी सांगितले की, ओबीसी प्रवर्गात आधीच ३७४ जाती आहेत. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीत स्थान देऊ नये, एवढीच आमची मागणी आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेतल्याचेही स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दाखवून आम्ही आमची भूमिका मांडली, असे ते म्हणाले.भुजबळ यांच्या या ठाम भूमिकेमुळे राज्यातील आरक्षणाचा प्रश्न अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. सरकारसमोर आता मराठा आणि ओबीसी समाजाच्या मागण्यांमध्ये तोल साधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.