Sharad Pawars important statement on Maratha OBC reservation : मराठा – ओबीसी आरक्षणावर शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Mumbai : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून तापलेलं राजकारण अजून शमलेलं नाही. अशा पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महत्त्वाचं विधान करत सरकारच्या पावलांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
शरद पवार म्हणाले, “गेल्या काही दिवसांत समाजा – समाजांमध्ये अस्वस्थता वाढताना दिसतेय. बंजारा समाजाने मागणी केली की त्यांना आदिवासींच्या सवलती द्या. दुसऱ्याच दिवशी आदिवासी समाजाने मोर्चा काढून विरोध दर्शवला. अशा प्रकारे कारण नसताना दोन समाजात संघर्ष निर्माण होतोय.”
Local Self-Government Elections : नोव्हेंबरमध्ये निवडणुका होऊ शकल्या असत्या, पण..!
राज्य सरकारने मराठा आणि ओबीसी या दोन्ही आरक्षण प्रश्नांसाठी दोन उपसमित्या नेमल्या आहेत. यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “सरकारने दोन समित्या नेमल्या एक राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली आणि दुसरी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली. पण जातीच्या आधारावर समित्या नेमल्याने निर्णय व्यापक होईल का? की एका वर्गापुरता मर्यादित राहील? मला वाटतं, सामंजस्य हवं असेल तर सर्वांनी एकत्र बसलं पाहिजे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच केलेल्या विधानात “पवारसाहेब एक्स बोलले की त्याचा वाय अर्थ निघतो” असा टोला लगावला होता. यावर शरद पवार म्हणाले, “त्यांना जर अर्थ कळत असेल तर मला काही म्हणायचं नाही. पण मी इतकंच सांगतो कटुता थांबवून एकवाक्यतेने समाजातील ऐक्य जपलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनीही अशा वातावरणासाठी हातभार लावला पाहिजे.” असे त्यांनी स्पष्ट केले.