Water discharge begins Administration keeps a close eye on overzealous tourists : पाण्याचा विसर्ग सुरू, काही ठिकाणी रहदारीस अडथळा
Nagpur : सततच्या पावसाने जिल्ह्यातील काही जलाशये ओव्हरफ्लो झाली आहेत. पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने ग्रामीण भागांतील काही ठिकाणी रहदारीस अडथळे निर्माण झाले आहेत. उमरेड तालुक्यातील मकरधोकडा आणि पारडगाव जलाशय सततच्या मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. निसर्गाचे हे मनमोहक आणि भव्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने जलाशय परिसरात दाखल होत आहेत. काही पर्यटकंच्या अतिउत्साहामुळे इतरांचेही जीव धोक्यात येतात. अशा पर्यटकांवर प्रशासनाची करडी नजर आहे.
निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक प्रशासनाने सावधगिरीचे आवाहन केले आहे. मकरधोकडा आणि पारडगाव जलाशय ओव्हरफ्लो झाल्याने मटकाझरी मार्गे वडद, पेंढरी मार्गे चिमणाझरी, हुडकेश्वर मार्गे वडद, उटी मार्गे पारडगाव आणि फुकेश्वर मार्गे डव्हा या मार्गांवर पाण्याचा प्रभाव जाणवत आहे. खापरी रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने स्थानिक रहदारीत अडथळे निर्माण झाले आहेत. प्रशासनाने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
जलाशयाच्या परिसरातील निसर्गसौंदर्य पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. मात्र, पाण्याचा वेगवान प्रवाह आणि बदलत्या हवामान परिस्थितीमुळे स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जलाशय परिसरात जाण्यापूर्वी स्थानिक हवामान आणि रस्त्यांच्या परिस्थितीची माहिती घ्यावी. पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे आणि सुरक्षित अंतर राखावे, असे प्रशासनाने सुचवले आहे.
Supriya Sule : सुप्रिया सुळे यांच्या ‘मटण’ वक्तव्यावर भाजपचा हल्लाबोल
“निसर्गाचा आनंद लुटा, पण सुरक्षितता प्रथम!” असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पर्यटकांनी गर्दीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अशी विनंती स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आली आहे.