Breaking

Board Exams : काय सांगता! भौतिकशास्त्राचा पेपर फुटला ?

Rumors of Physics Paper Leaked at Deori : हाती लागलेली उत्तर पत्रिका खोटी, शिक्षण विभागाचा दावा

Deori Gondia एका पत्रकाराच्या हाती उत्तर पत्रिकेची झेरॉक्स लागली. कुणीतरी सांगितले ही आजच्या पेपरची उत्तरं आहेत. आज पेपर भौतिकशास्त्राचा. याचा अर्थ भौतिकशास्त्राचा पेपर फुटला आहे, अशी एक आरोळी कुणीतरी दिली. त्यानंतर अख्ख्या गोंदिया जिल्ह्यात ‘देवरीत पेपर फुटला’ अशी चर्चा सुरू झाली. यात तथ्य नाही, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे. पण यातून कॉपी सुरू आहे, हे मात्र नक्कीच सिद्ध झाले.

राज्य सरकारने कॉपीमुक्त अभियान सुरू केले आहे. पेपर फुटल्याची बातमी अफवा आहे, असे समजले तरीही कॉपी सुरू आहे, हे निश्चित. त्यामुळे खऱ्या अर्थाने कॉपीमुक्त अभियाना फज्जा उडाला आहे, असे म्हणायला हरकत नाही. देवरीतील एका परीक्षा केंद्रावर बारावी भौतिकशास्त्राचा पेपर लीक झाला. सर्व प्रश्न-उत्तरांची झेरॉक्स प्रत एका पत्रकाराच्या हाती लागली. त्यामुळे बारावी परीक्षेदरम्यान केंद्रावर सर्रास कॉपी सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला.

Lakhpati Didi : ७८ हजार महिलांचे वार्षिक उत्पन्न वाढले!

साेमवारी बारावी विज्ञान शाखेचा भौतिकशास्त्राचा पेपर होता. शहरातील एका केंद्रावर त्याच शाळेतील एक विद्यार्थी बारावीचा पेपर देत असताना त्याला हा प्रकार आढळून आला. त्याने पत्रकाराला केंद्रावर मिळालेली झेरॉक्स प्रत दिली. झेरॉक्स कॉपीवर एकूण नऊ प्रश्नांची उत्तरे लिहिलेली होती. प्रश्नपत्रिका बाहेर गेल्याशिवाय हे शक्यच नव्हते.

या संदर्भात गटशिक्षणाधिकारी महेंद्र माेटघरे व उपशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर दिघोरे यांनी एकाही केंद्रावर असा प्रकार घडला नसल्याचे सांगितले. तसेच या प्रकारात तथ्य नसल्याचेही स्पष्ट केले. या प्रकरणात नागपूर येथील उपसंचालकांकडे तक्रार करणयात आल्याचे कळते.

Yavatmal Book Festival : नायब तहसिलदारांचा एकपात्री प्रयोग!

केंद्रावरील शिक्षकांवरही शंका घेतली जात आहे. एकूणच या प्रकारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे बोलले जात आहे. हे घडत असताना शिक्षण विभाग आणि महसूल विभागाचे भरारी पथक काय करत आहेत, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.