Sambhaji Bhide : पाकिस्तानला संपवल्याशिवाय जग नीट चालणार नाही!

Sambhaji Bhides statement; Criticism on Constitution, Dandiya also : संभाजी भिडेंचं वक्तव्य; संविधान, दांडियावरही टीका

Sangli : श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीच्या सांगता कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी मार्गदर्शन करताना पाकिस्तान संपवण्याची गरज असल्याचे सांगितले. “पाकिस्तानला संपवल्याशिवाय जग नीट चालणार नाही. हिंदुस्थान टिकवायचा असेल तर आज शत्रूला संपवलं पाहिजे. पण आपला शत्रू कोण, परका कोण हे न कळणारा मूर्ख समाज आज जगतो,” असे भिडे म्हणाले.

त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
याआधीही संभाजी भिडे यांनी दुर्गामाता दौड कार्यक्रमात नवरात्रीतील दांडिया खेळावर वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी दांडिया खेळणे म्हणजे “हांडगेपणा” असल्याचे म्हटले होते. यासोबतच त्यांनी भारतातील लोकांना “निर्लज्ज” असे संबोधले होते आणि भारतीय संविधानावरही टीका केली होती.

MSRTC News : एसटीची प्रस्तावित 10% भाडेवाढ रद्द !

“आपली लायकी काय आहे ते त्या संविधानात लिहिलंय. आणि लोक ते वाचतातही पोटात मुरड आल्यासारखे. काय संविधान, कसले संविधान? भारत हा 1300 वर्षे मुस्लिम व युरोपियनांच्या पारतंत्र्यात खितपत पडलेल्या लोकांचा देश आहे. ज्यांना पारतंत्र्याची, गुलामीची लाज वाटत नाही त्या लोकांचा हा निर्लज्ज देश आहे,” असे भिडे म्हणाले होते.

Sudhir Mungantiwar : आ.सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे चिमुकल्या वैष्णवीला मिळाले नवे जीवन

भिडे यांनी यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त विधानं केली असून, त्यावरून सामाजिक तसेच राजकीय वर्तुळात त्यांच्यावर टीका होताना दिसते.