Breaking

Sanjay Gaikwad : गायकवाड म्हणतात, ‘मी माझे शब्द मागे घेतो’!

Expressed apology for controversial statement : वादग्रस्त वक्तव्यानंतर व्यक्त केली दिलगिरी

Buldhana महापुरुषांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर विराेधकांनी टिका केल्याने अखेर शिंदे सेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना उपरती झाली. त्यांनी महापुरुषांविषयी केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला बैलजाेडीची मदत केल्यानंतर पत्रकारांशी बाेलताना आमदार गायकवाड यांनी ठाकरे ब्रँड नसल्याचे म्हटले होते. तसेच बहुभाषिकतेचे महत्त्व सांगताना आमदार संजय गायकवाड म्हणाले हाेते की, “छत्रपती संभाजीराजेंनी १६ भाषा शिकल्या. ते मुर्ख होते का? शिवाजी महाराज, जिजाऊ, ताराराणी, येसूबाई यांनी अनेक भाषा शिकल्या. ते सगळे मुर्ख होते का?.’ त्यांच्या या वक्तव्याचा विराेधकांनी चांगलाच समाचार घेतला होता. विरोधकांसह सहकाऱ्यांकडूनही होत असलेल्या टिकेनंतर आमदार गायकवाड यांनी आपले वक्तव्य मागे घेतले आहे.

Maharashtra Legislative Council Monsoon Session: : ना नोंदणीकृत कंपनी, ना आयटीआर, तरी मंत्री शिरसाटांच्या मुलाला कंत्राट

छत्रपती संभाजी महाराजांची जयंती राज्यातच नव्हे तर देशात सर्वात माेठी मीच साजरी करतात. त्यामुळे त्यांचा आदर, अनादर मला शिकवू नये. संभाजी महाराजांविषयी केलेल्या विधानामुळे कुणाचे मन दुखावले असेल तर मी माझे शब्द मागे घेताे, अशी प्रतिक्रीया आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : सोलर वीज उत्पादकांची फसवणूक होणार का? ऊर्जा विभागाने संदिग्धता दूर करावी !

शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे ब्रँड नसल्याचे म्हटले होते. त्यावर आता उद्धव सेनेच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी उत्तर दिले आहे. ठाकरे ब्रँडमुळेच तुम्हालाच विजय मिळाला आहे हे विसरू नका, अशी टिका शेळके यांनी केली आहे. ‘बुलढाणा विधानसभा मतदार संघाची निवडणूक तुम्ही दाेन वेळा पराभूत झाले. अखेर ठाकरे ब्रँडमुळे तुम्ही बुलढाणा मतदार संघात विजय मिळवू शकले. हे तूम्ही विसरले असाल. पण बुलढाणा मतदार संघातील मतदार विसरले नाहीत,’ असेही शेळके यांनी म्हटले आहे.