New scam every day in Maharashtra, Sanjay Raut presents ‘horoscope’ of Mahayuti : महाराष्ट्रात रोज नवा घोटाळा, संजय राऊत यांनी मांडली महायुतीची ‘ कुंडली’
Mumbai: एकनाथ शिंदे सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढल्याचा आरोप, शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. सामना वृत्तपत्रातील अग्रलेखात एमएमआरडीए टेंडर घोटाळा, धुळ्यातील बेहिशेबी रक्कम, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि आमदारांकडून रॉयल्टी चोरी यासारख्या प्रकरणांचा उल्लेख करण्यात आला आहे. लुटारू सरकारला रोज चाबकाचे फटके विधानसभेत मारावेत असा यांचा कारभार आहे, अशा शब्दात संताप व्यक्त करण्यात आला आहे.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. विधानसभेत विरोधी पक्षाला मान द्यायचा नाही, विरोधकांचा आवाज दाबायचा असे लुटारू सरकारचे धोरण आहे. महाराष्ट्रात सध्या भ्रष्टाचाराचा धुमधडाका चालला आहे, तो रोखायचा कोणी? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
Eknath Shinde : शिंदेसेनेत गुंडाचा प्रवेश; चुकून प्रकार घडल्याचा दावा
ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. त्यासोबतच अनेक कथित घोटाळ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यात ‘एमएमआरडीए’च्या ३ हजार कोटींच्या टेंडर घोटाळ्यापासून ते धुळ्यात सापडलेल्या बेहिशेबी रकमेपर्यंत आणि मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या नावावर कोट्यवधींच्या मालमत्तेचा संदर्भ देण्यात आला आहे.
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी हिंदीचा शासन निर्णय फाडला, राज्यभर आंदोलन निर्णयाची होळी !
महाराष्ट्रातील प्रत्येक शासकीय विभागावर भ्रष्टाचाराचा ठपका असल्याचे म्हणले आहे. राज्यव्यवस्था भ्रष्ट झाली असून, आमदारांना निवडून आणण्यासाठी ५० ते १०० कोटी रुपये खर्च केले जात असल्याचे म्हटले आहे. भ्रष्टाचाराला ‘मुक्त रान’ मिळत आहे . सध्या महाराष्ट्रात सावळा गोंधळ आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ‘एमएमआरडीए’च्या एकाच टेंडरमध्ये तीन हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आले व ते टेंडरच शेवटी रद्द करावे लागले. महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे हे चित्र विषण्ण करणारे आहे, असेही म्हटले आहे. अधिवेशनाच्या प्रारंभालाच हे आरोप समोर आले आहेत. त्यावर अधिवेशनात पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.
___