Neelam-Gorhe-is- Perverted-Woman-Shivsena-MP- Sanjay-Raut :
खासदार संजय राऊत यांचे वादग्रस्त विधान, राजकारण तापले
Mumbai : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर ठाकरे गटाने जोरदार हल्लाबोल केला आहे. नीलम गोर्हे (Neelam Gorhe) या बाई नव्हे. विकृत (Perverted) व्यक्ती आहे. बाई नव्हे तर बाईमाणूस आहे, असे वादग्रस्त विधान खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले.
दिल्ली येथे पार पडलेल्या ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमलेनातील एक परिसंवादात बोलताना नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज गाड्या दिल्यानंतर पद मिळत होते, असे विधान केले आहे. या विधानावरून राज्याच्या राजकारणात वादळ उठले असून यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना नीलम गोऱ्हे यांच्यावर हल्ला चढविला.
Sanjay Raut : ‘त्या’ पुरस्कारासाठी एकनाथ शिंदे यांची निवड योग्यच !
कोणतीही पात्रता नसताना उद्धव ठाकरे यांनी गोऱ्हे यांना चारवेळा विधान परिषदेचे सदस्यत्व दिले. त्यावेळी त्यांनी मर्सिडीज दिल्या असतील, त्याचे बिल द्यावे किंवा कोणत्या शोरुममधून त्यांनी या गाड्या खरेदी केल्या, त्याचे नाव सांगावे, असे आव्हान दिले. नीलम गोर्हे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी दिली नव्हती. त्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. कोणत्या बाईला तुम्ही पक्षात घेतले, असा सवाल त्यांनी केला होता, असेही खासदार राऊत म्हणाले, लक्षवेधी लावायला त्या किती पैसे घेत होते, याची माहिती त्यांनी द्यावी. नीलम गोर्हे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना उमेदवारी देण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप केला.
नाशिक येथील विनायक पांडे यांना मध्य नाशिकमधून उमेदवारी देण्यासाठी पैसे मागितले होते. त्याचप्रमाणे पुण्यातील महापालिकेतील शिवसेनेचे नेते अशोक हरनाळ या नेत्यालाही पैसे मागितले होते. त्यांच्या मुलाखती न्यूज चॅनेलनी घ्याव्या. त्या सत्यस्थिती सांगतील, असा दावाही त्यांनी केला.
नाशिक (Nashik) येथील शिवसेनेचे नेते *(Vinayak Pane) विनायक पांडे यांनी खासदार संजय राऊत यांच्या आरोपाला दुजोरा दिला आहे. खासदार राऊत यांनी पत्रकार परिषदेत विनायक पांडे यांच्या नावाचा उल्लेख केल्यानंतर प्रसार माध्यमांनी विनायक पांडे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी बोलताना पांडे यांनी खासदार राऊत यांचा आरोप खरा असल्याचे सांगितले.
Dr Neelam Gorhe : शेतकरी म्हणाले, ‘ताई तुम्ही होत्या म्हणून…’
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक मध्य मतदारसंघातून उमेदवारीसाठी आपण इच्छुक होतो. गोऱ्हे यांचे नाशिकमधील कार्यकर्ते बाहेती यांच्या मध्यस्थीने गोऱ्हे यांच्याशी संपर्क साधला. त्यासाठी त्यांनी पैशांची मागणी केली. यापैकी काही रक्कम आपण त्यांंना दिली. परंतु नाशिक मध्यमधून मात्र उमेदवारी मिळाली नाही. दुसर्या व्यक्तीला ही उमेदवारी मिळाली. यानंतर त्यांनी गोऱ्हे यांच्याकडे पैशाची मागणी केली. तेव्हा त्यांनी पैसा देण्यास नकार दिला. परंतु हे सर्व आपण पत्रकार परिषद घेऊन जाहीर करू, अशी धमकी दिल्यानंतर त्यांनी मुंबईत आपल्याला काही रक्कम परत केली, असा दावा त्यांनी केला. आपण दिलेली पूर्ण रक्कम नव्हे तर काही रक्कम कापून ही रक्कम परत दिल्याचा दावा विनायक पांडे यांनी केला.