Sanjay Raut’s claim, comments on BJP women leaders : संजय राऊत यांचा दावा, भाजप महिला नेत्यांवरही टीका
Mumbai : लोढाच्या माध्यमातून भाजपने ‘हनी ट्रॅप’ लावला असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणात विजय वडेट्टीवार यांनी काल निसटता उल्लेख केला होता मी आज स्पष्ट सांगतो. एकनाथ खडसे यांना आणि मला या प्रकरणाचं सगळ माहिती आहे. असा दावाही त्यांनी केला. योगेश कदम यांच्या आईच्या डान्सबार वर कारवाई झाली त्यावरून त्यांनी भाजप महिला नेत्यांवरही ‘ त्या फडफडणाऱ्या नेत्या कुठे गेल्या?’ असा सवाल उपस्थित केला आहे.
पोलिसांची पथके आज लोढा यांच्या अनेक ठिकाणांवर छापा मारत आहेत. त्यांना चार पेन ड्राइव्ह शोधायचे आहेत. दोन सीडी आहेत. त्यासाठी पोलिसांची धावाधाव सुरू आहे. त्यात जे आहे, ते गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांनाही माहीत आहे. हनी ट्रॅपची सुरुवात दिल्लीतून झाली. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी झाली आहे. यामुळे 16 ते 17 आमदार आणि चार खासदार भाजपने आपल्याकडे वळवले. त्यांना सीडी दाखवली जात होती. ईडी, सीबीआय हा प्रकार वेगळा आहे. प्रफुल्ल लोढा हा व्यक्ती या हनी ट्रॅप मागे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लोढा यांचा फोटो आहे. त्या फोटोची चौकशी करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
Nashik Honey Trap : वेळ आल्यास, नाशिक हनी ट्रॅप’ची सीडी तिकीट लावून दाखवू !
या प्रकारामध्ये शक्यतो तक्रारदार नसतो. परंतु दृश्यफल दिसत असते. या प्रकरणात संबंधित व्यक्तीला ब्लॅकमेल केले जाते. आता ते स्वतःच ब्लॅकमेल होत आहेत. या प्रकरणाची सूत्र जामनेर, जळगाव, नाशिक आणि दिल्ली येथून हलली आहेत. यासंदर्भात एकनाथ खडसे यांची मुलाखत घ्या. त्यातून अनेक गोष्टी बाहेर येणार आहेत. देवेंद्र फडणवीस किती खोटे बोलत आहेत, हे त्यांना माहिती आहे. हनीट्रॅपच्या सूत्रधार त्यांच्यासोबत आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. विजय वडेट्टीवार यांनी थोडी माहिती दिली आहे. यासंदर्भात पूर्ण माहिती मी देणार आहे. यासंदर्भात उद्या सर्व काही स्पष्ट होणार आहे. ही लोक वेश पलटून जात होते. त्यांना सीडी दाखवत होते, असा दावा राऊत यांनी केला.
Suraj Chavhan : माफी मागितली पण, सूरज चव्हाणांवर गुन्हा दाखल, अटकेसाठी ‘छाया’ आक्रमक!
महाराष्ट्रात फडणवीसांच जे सरकार चालवलं जातय ते सरकार नसून गुंडांची टोळी आहे. राज्यात एकप्रकारच अराजक माजलेलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून छातीठोक भाषण करत आहेत, हे करीन, ते करीन. याला सरळ करीन त्याला सरळ करीन. भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकीन. त्यांच्या राज्यात काय चाललय ते स्वत गृहमंत्री, मुख्यमंत्री आहेत. इतका हतबल मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिलेला नाही. आधीचं सरकार घटनाबाह्य होतं. आता फडणवीसांच सरकार अनैतिक, व्याभिचारी सरकार आहे. फडणवीस काही करु शकत नाहीत. अशा प्रकारच सरकार हे महाराष्ट्राला कलंकीत करणारं सरकार आहे असं संजय राऊत म्हणाले.
Honey Trap Case : हनी ट्रॅप प्रकरणात जामनेर, पहूर येथे धाडी, प्रफुल लोढा अटकेत !
आमदार, मंत्री, पक्षाचे पदाधिकारी ज्या प्रकारच वर्तन करतायत, ते याआधी महाराष्ट्रात कधी घडलं नव्हतं. काल खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर छावा संघटनेच्या राज्यप्रमुखावर हल्ला झाला. आमदार निवासात मारामाऱ्या होतात. मंत्र्याच्या बारमधून बारबाला पकडल्या जातात. कुठे गेल्या भारतीय जनता पार्टीच्या फडफडणाऱ्या महिला नेत्या. विरोधी पक्षांच्या लोकांवर काही गुन्हे, आरोप झाले की, या सगळ्या महिला नेत्या पुढे येत होत्या. आज कुठे आहेत?. मंत्र्याच्या लेडीज बारमध्ये महिला सापडल्या, महिलांलर अत्याचार वाढले आहेत. हनी ट्रॅपची प्रकरण वाढलेली आहेत असं संजय राऊत म्हणाले.
_____