Jalils allegations of corruption against Shirsat with evidence : जलील यांचे शिरसाट यांच्यावर भ्रष्टाचाराचे पुराव्यासह आरोप
Chhatrapati Sambhajinagar : शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात माजी खा. इम्तियाज जलील हे अनियमितता आणि गैरप्रकाराबद्दल भ्रष्टाचाराचे पुराव्यासह आरोप करत आहेत. यावरून राजकारण कापले आहे. या दोन्ही नेत्यातील वाद आता रस्त्यावर उतरला आहे. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला असून कार्यकर्त्यांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
पालकमंत्री संजय शिरसाट आणि इम्तियाज जलील यांच्यातील राजकीय वाद आता थेट रस्त्यावर उतरला आहे. ब्रिजवाडी रमाई चौक गल्लीत हा प्रकार घडला या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून, एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर इम्तियाज जलील यांच्या विरोधात पोस्ट टाकल्याच्या कारणावरून, बालाजी खोतकर, मनोज भारसाखळे, किरण साळवे आणि सावजी म्हस्के या चौघांनी शिरसाट समर्थकाला घरासमोर येऊन मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Kolhapur : घरी जाता यावे म्हणून… अल्पवयीन सहकाऱ्याने विद्यार्थ्याला शॉक देऊन मारले!
गेल्या काही दिवसांपासून एमआयएमचे माजी खा. इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात गैरप्रकार, अनियमितता व भ्रष्टाचाराचे आरोप केले. शिरसाठ यांनी एमआयडीसीचा भूखंड लाटण्याचा आरोप केल्यानंतर जलील यांनी एमआयडीसी मध्ये जाऊन अधिकाऱ्यांना या संदर्भात विचारणा केली. यानंतर शिरसाट यांच्या घरावर चिखल फेक करण्यासाठी कार्यकर्ते येणार अशी माहिती समोर आली आणि जलील यांच्या घरासमोर गर्दी होऊन तणाव निर्माण झाला होता.
Sharad Pawar: तर…. ही परिस्थिती आली नसती; शरद पवारांचा अजितदादांना टोला
दरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र वाकयुद्ध रंगले आहे. इम्तियाज जलील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जलील यांनी माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी दावा केला की, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माझ्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना थेट फोन करून दबाव टाकला. ‘तत्काळ गुन्हा दाखल करा, अन्यथा बदल्या करीन,’ अशा शब्दांत त्यांनी धमकी दिली, पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः मला सांगितले की, ‘ साहेब, आमच्यावर दबाव आहे. आम्ही काय करावे? संजय शिरसाट आम्हाला धमक्या देत आहेत’
याप्रकरणी आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत असेही जलील यांनी म्हटले आहे.