Breaking

Santosh Deshmukh murder case : कृष्णकृत्यांच्या जखमांवर सद्भावनेची फुंकर!

Congress takes out Sadbhavana Yatra, gets spontaneous response from people : मस्साजोग ते बीड काँग्रेसची सद्भावना यात्रा, उत्स्फूर्त प्रतिसाद

Beed विकृतीचा कळस गाठणाऱ्या घटनांसाठी चर्चेत असलेल्या मस्साजोग व बीड या गावांमध्ये आज, शनिवार, दि. 8 मार्चला काँग्रेसने सद्भावनेचे बीज रोवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ Harshwardhan Sapkal यांच्या नेतृत्वातील या पहिल्याच उपक्रमाला तेथील स्थानिक लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने काँग्रेसमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

मस्साजोगचे Masaajog सरपंच संतोष देशमुख यांची दोन महिन्यांपूर्वी हत्या झाल्यापासून मस्साजोग व बीड ही गावे चांगलीच प्रसिद्धीत आली आहेत. परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या आश्रयाने या जिल्ह्यातील गुंडगिरी व गुन्हेगारी वाढल्याचा वारंवार आरोप होत आहे. अखेर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला तरी या भागातील खंडणी, महिलांवर अत्याचार व वन्य प्राण्यांची हत्या व तस्करी असे सर्व अवैध व अनैतिक कार्याची मोठी यादी बाहेर येत आहे.

Water shortage issue : साडी नेसून उपसरपंचाने फोडला पाण्यासाठी टाहो!

संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण व अमानवीय पद्धतीने हत्या झाल्याचे दिसून आल्यानंतर काँग्रेसने तेथे सद्भावना यात्रा काढली. समाजात प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या यात्रेत देशमुख परिवारातील सदस्य सहभागी झाले होते. देशमुख कुटुंबांच्या लहान मुलांना अध्यक्ष सपकाळ यांनी आपल्या खांद्यावर घेऊन पदयात्रा केली.

काँग्रेसचा पुढाकार

बीडची स्थिती बिहारपेक्षा भयंकर असल्याचे वास्तव समोर येत असताना कोणत्याही राजकीय पक्ष या वादात पडण्याची भूमिका घेतली नाही. मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र रंगविण्याचा प्रयत्न होत असताना सर्वोदयी विचाराचे असलेले सपकाळ यांनी या गावातून सद्भावनेची वात लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांचा हा पहिलाच मोठा सार्वजनिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे दुसर्या पक्षातील नव्हे तर काँग्रेसमधील ज्येष्ठांचे लक्ष लागले होते. परंतु साने गुरुजींचे खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे, या प्रसिद्ध गीताच्या तालावर स्थानिक गावकर्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला. मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर या यात्रेला सुरूवात झाली. ही सद्भावना यात्रा बीडपर्यंत जाणार आहे. जवळपास ४७ किलोमीटरचे हे अंतर दोन दिवसात कापले जाणार आहे. या यात्रेचा समारोप ९ मार्च रोजी बीडमध्ये होणार आहे. या समारोपाच्या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हजेरी लावणार आहे.

Sudhir Mungantiwar : केवळ भाषणांनी महिलांचे प्रश्न सुटणार नाहीत !

यावेळी विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार, खासदार कल्याण काळे, खासदार बळवंत वानखेडे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील,  खासदार रजनी पाटील, प्रवक्ता अतुल लोंढे यांच्यासह मराठवाडा व राज्यातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.