Committee expresses strong displeasure over promotions, vacant posts : अनुसूचित जमाती कल्याण समितीचा जिल्हा दौरा; आमदार दौलत दरोडा अध्यक्ष
Amravati राज्य विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या रिक्त पदे आणि आरक्षणानुसार होणाऱ्या पदोन्नतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. समितीचा दौरा मंगळवारी (१९ ऑगस्ट) सुरू झाला असून, पहिल्याच दिवशी नियोजन भवनात आयोजित आढावा बैठकीत हा मुद्दा प्रमुख राहिला.
समितीने केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीत काही विभागांनी माघार घेतल्याचा ठपका ठेवला. मुख्याधिकाऱ्यांची रिक्त पदे असूनही वरिष्ठांनी दखल न घेतल्याचे स्पष्ट झाल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
Local Body Elections : जि.प., पं.स. निवडणुकांच्या प्रभाग रचनेवर अंतिम निर्णय आयुक्तांकडे
बैठकीस समितीचे अध्यक्ष आ. दौलत दरोडा यांच्यासह सदस्य केवलराम काळे, राजू तोडसाम, शांताराम मोरे, मंजुळा गावित, रामदास मसराम, उमा खापरे, राजेश राठोड, विनोद निकोले उपस्थित होते. मात्र सात आमदार अनुपस्थित राहिल्याने चर्चा रंगली.
पदभरती आणि आरक्षण प्रक्रिया, अनुशेष आणि जात पडताळणी आणि आदिवासी उपयोजना अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजना यावर चर्चा झाली. शामाप्रसाद मुखर्जी सौरऊर्जा योजना आदिवासींपर्यंत पोहोचविण्यात वनविभाग अपयशी ठरल्याबद्दल समितीने नाराजी व्यक्त केली. मेळघाटातील आदिवासींना या योजनांचा अत्यल्प लाभ झाल्याचे दिसून आले.
विविध विभागांचे कामकाज: वन, पोलीस, वीज वितरण, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, महिला व बालविकास, कृषी, पशुसंवर्धन