School ID scam : शालार्थ आयडी घोटाळ्यात दोन शिक्षणाधिकारी अटकेत

Misuse of online system, major action by special investigation team : ऑनलाईन प्रणालीचा गैरवापर, विशेष तपास पथकाची मोठी कारवाई

Nagpur : राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकाने मोठी कारवाई करत दोन वरिष्ठ शिक्षणाधिकाऱ्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये नागपूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांचा समावेश आहे. या दोघांविरुद्ध ऑनलाईन शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर करत बनावट शिक्षकांची आयडी तयार करून शासनाकडून कोट्यवधी रुपयांचे वेतन उकळल्याचा गंभीर आरोप आहेत.

प्राथमिक तपासात समोर आले आहे की, शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून शालार्थ आयडी जारी करण्याची कोणतीही अधिकृत प्रक्रिया न पार पाडता, काही भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून बोगस आयडी तयार केल्या. या आयडीच्या आधारे बोगस शिक्षकांना शाळांमध्ये दाखल केल्याचे दाखवत महिनोंमहिने वेतन देण्यात आले. यामुळे शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली. एसआयटीकडून चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे आणि दस्तऐवज जमा करण्यात आले असून, त्याच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे.

Annasaheb Dange : 23 वर्षांनंतर अण्णासाहेब डांगे यांची भाजपमध्ये घरवापसी !

पोलिसांनी काळुसे आणि कुंभार यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. शंभूराजे माहितीनुसार, या चौकशीतून आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत. ही कारवाई म्हणजे शालार्थ घोटाळ्याच्या तपासातील एक मोठी आणि निर्णायक पावले असून, राज्य सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीकडून ही पहिली मोठी अटक आहे. या प्रकरणात आणखी आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.